• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 20, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

खेलो इंडिया युथ गेम्स 2021; कब्बडीत मुलींचे संघाला रौप्य मुलांना कांस्य पदक

by pravin
June 8, 2022
in कबड्डी, खेलो इंडिया यूथ गेम्स
खेलो इंडिया युथ गेम्स 2022; कब्बडीत मुलींचे संघाला रौप्य मुलांना कांस्य पदक
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पंचकुला (प्रतिनिधी): कबड्डीच्या मैदानावर महाराष्ट्राच्या मुलींनी रूपेरी यश मिळवले. हरियानासोबत सुवर्णपदकासाठी झालेली लढत त्यांना जिंकता आली नसली तरी दुसरे स्थान पटकावले. हरियानाकडून (४८-२९) १९ गुणांनी पराभव झाला. मुलांच्या संघाला कांस्य पदक मिळाले.येथील ताऊ देवीलाल स्टेडियममध्ये खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राला कबड्डीत मुलींना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. हरियानाच्या पूजाच्या चढायांपुढे महाराष्ट्राचा निष्प्रभ ठरला. एक-दोन पकडी वगळता महाराष्ट्र संघाला फार प्रभाव दाखवता आला नाही.

सामन्यात पहिल्या चढाईत पहिला बोनस पॉईंट हरियानाने घेतला. महाराष्ट्रानेही पहिल्या चढाईत गुण मिळवला. पुन्हा हरियानाचीही चढाई यशस्वी ठरली. टाईम आउटला स्कोर चारच्या बरोबरीत होता. हरियानाच्या पूजाने चढाईत दोन गुण मिळवले. दुसऱ्या टाईम आऊटला महाराष्ट्र ६ तर हरियाना ७ गुणांवर होता. इथपर्यंत लढाई दोलायमान होती. परंतु पूजाची दुसरी चढाईही महाराष्ट्रावर भारी पडली. त्यात दोन पॉईंट गेले. यशिकाच्या यशस्वी चढाईने स्कोर ९-९ झाला.

पूजाने पु्न्हा तीन गुण घेतले. पहिल्याच हापमध्ये महाराष्ट्र ऑलआउट झाला. परिणामी हरियानाला (१८-१२) सहा गुणांची आघाडी मिळाली. पूजाच्या चढाईने पहिल्या हापला हरियाना (२५)-महाराष्ट्र (१५) १० गुणांनी पिछाडीवर पडला.
महाराष्ट्राची हरजीत व यशिका, मनिषा बोनस गुण घेत राहिले. परंतु महाराष्ट्राला पकडी करता आल्या नाही.

दुसऱ्या हापमध्ये टाईम आऊटला हरियानाने (३३ गुण) आघाडी घेतली. महाराष्ट्राचे १९ गुण होते.सामन्यात सात मिनिटे उरली असताना महाराष्ट्राला पु्न्हा एका ऑलआउटला सामोरे जावे लागले. परिणामी हरियानाला २१ गुणांची भरभक्कम आघाडी मिळाली. त्यांच्या पूजाची एकही चढाई गुणांविना गेली नाही. शेवटी १९ गुणांनी महाराष्ट्राचा पराभव झाला.

कब्बडीतील विजेते (मुले)

सुवर्ण – हिमाचल प्रदेश
रौप्य – हरियाना
कांस्य – महाराष्ट्र व उत्तर प्रदेश

मुली

सुवर्ण – हरियाना
रौप्य – महाराष्ट्र
कांस्य – आंध्र प्रदेश व तामीळनाडू

Tags: khelo india youth games 2022khelo india youth games 2022 Marathi Newskhelo india youth games 2022 NewsSilver boys bronze medal for girls' team in Kabaddi
ShareTweetSend
Next Post
खेलो इंडिया युथ गेम्स2022; महाराष्ट्राची हरियानात सुवर्ण-रौप्य लूट पाचव्या दिवशी चौदा पदके पटकावली.

खेलो इंडिया युथ गेम्स2021; महाराष्ट्राची हरियानात सुवर्ण-रौप्य लूट पाचव्या दिवशी चौदा पदके पटकावली.

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.