बंगळुरु-भारतीय क्रिकेट संघात एखाद्या खेळाडूला आपलं स्थान निर्माण करण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या देशात राष्ट्रीय संघात जागा मिळवणं खूप मोठं आव्हानच आहे. यामुळेच आपल्या देशातील अनेक तरुणांचं एक मोठा क्रिकेटर होण्याचं स्वप्न अनेकदा अपूर्णच राहतं. याच पार्श्वभूमीवर दक्षिण अफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने एक विधान केलं आहे.
डिव्हिलियर्सने इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पॉडकास्टमध्ये बोलताना हे वक्तव्य केलं आहे. यावेळी डिव्हिलियर्सने जर आपला जन्म भारतात झाला असता तर कदाचित राष्ट्रीय संघात जागा मिळवू शकलो नसतो असं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणं माझं स्वप्नच राहिलं असतं असं डिव्हिलियर्स म्हणतो. भारतीय संघात आपली जागा निर्माण करणं सोपी गोष्ट नसून यासाठी भारतीय खेळाडूंचा आदर केला पाहिजे असंही मत त्याने मांडलं आहे.डिव्हिलियर्सने म्हटलं.