• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

पहा विराटने भन्नाट झेल ;सोशल मीडियावर होतेय व्हायरल

by pravin
February 10, 2022
in क्रिकेट
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

 नवी दिल्ली –  वेस्ट इंडिज संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा वनडे सामना बुधवारी (९ फेब्रुवारी) पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ४४ धावांनी विजय मिळवला. यासह मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात माजी कर्णधार विराट कोहलीने एक भन्नाट झेल टिपला होता, जे पाहून रोहित शर्माने दिलेली रिॲक्शन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

विराट कोहली जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. हे नेहमीच तो मैदानावर सिद्ध करत असतो. वेस्ट इंडीज विरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात देखील अप्रतिम क्षेत्ररक्षणाने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने ओडीयन स्मिथचा अप्रतिम झेल टिपला. ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

तर झाले असे की, वेस्ट इंडिज संघाची फलंदाजी सुरू असताना ओडीयन स्मिथ तुफान फटकेबाजी करत होता. त्याने ४५ व्या षटकात मिड विकेटच्या दिशेने एक मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न पूर्णपणे फसला चेंडूला लांब न जाता खूप उंच गेला होता. त्यावेळी सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराट कोहलीने अचूक अंदाज घेतला आणि हा झेल टिपला. परंतु झेल टिपत असताना त्याच डोकं खाली आधळलं होतं. हे पाहून कर्णधार रोहित शर्माला आश्चर्य झाले होते. तसेच हा अप्रतिम झेल टिपल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलले होते.

Keeps his calm 😎
Keeps his eyes on the ball 👍
Completes the catch despite a tumble 👌

Watch how @imVkohli put in a fantastic fielding effort to dismiss Odean Smith. 🎥 🔽 #TeamIndia #INDvWI @Paytm

— BCCI (@BCCI) February 9, 2022

 

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं तर, या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने तुफानी फटकेबाजी करत ६४ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ४९ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ५० षटक अखेर ९ बाद २३७ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाकडून शरमार्ह ब्रूक्सने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. तर अकील हुसेनने ३४ धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिज संघाचा संपूर्ण डाव १९३ धावांवर संपुष्टात आला होता. हा सामना भारतीय संघाने ४४ धावांनी आपल्या नावावर केला.

Tags: CricketindSee-Viratne-Bhannat
ShareTweetSend
Next Post

आयपीएल लिलावात प्रसिद्ध होणार ‘कृष्णा’!

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.