बेंगळुरू – मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयपीएल २०२२ (IPL 2022) ला सुरुवात होईल. तत्पूर्वी, आयपीएल २०२२ साठीचा मेगा लिलाव (IPL Mega Auction) बेंगलोर येथे १२ व १३ फेब्रुवारी रोजी पार पडेल. इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामासाठी दोन महिन्यांपेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. या लिलावात काही युवा भारतीय खेळाडूंवर चांगलाच पैसा बरसण्याची शक्यता आहे. यामधील प्रमुख नाव म्हणजे भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (Prasiddh Krishna) होय.
वेस्ट इंडिज विरुद्ध सध्या भारतीय संघ वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात प्रसिद्ध कृष्णा याने आपल्या धारदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत ६ बळी मिळवले आहेत दुसऱ्या सामन्यात तो सामनावीर ठरला. अशा परिस्थितीत अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या मेगा लिलावात त्याच्यामागे अनेक संघ धावताना दिसतील. त्यापैकी चार संघांबाबत आपण जाणून घेऊया.
२) कोलकाता नाईट रायडर्स-
प्रसिद्ध कृष्णा याने २०१८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळताना आयपीएल पदार्पण केले होते. त्यानंतर पुढील चार वर्ष तो याच संघासाठी खेळला. त्याने अनेक सामन्यांमध्ये निर्णायक भूमिका बजावली. मात्र, रिटेशनमध्ये केकेआर संघ व्यवस्थापनाने त्याचा विचार केला नाही. परंतु, केकेआर पुन्हा एकदा त्याला आपल्या संघात घेण्यासाठी इच्छुक असेल.
३) गुजरात टायटन्स-
आयपीएलमधील सर्वात नवी फ्रॅंचाईजी गुजरात टायटन्स आपला संघ नव्याने बांधत त्यांनी ड्राफ्टमध्ये हार्दिक पंड्या, शुबमन गिल व राशिद खान यांना निवडले होते. गुजरात संघाच्या गोलंदाजीचे नेतृत्व करण्यासाठी ते प्रसिद्ध कृष्णा याला मोठ्या किमतीत खरेदी करण्यासाठी उत्सुक असतील.
४) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
प्रसिद्ध कृष्णा देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व करतो. त्याचप्रमाणे तो आयपीएलमध्ये आपले गृहराज्य असलेल्या कर्नाटक राज्यातील फ्रॅंचाईजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उत्सुक असेल. आरसीबी व्यवस्थापनही मोहम्मद सिराज याच्यासह दुसरा भारतीय गोलंदाज म्हणून प्रसिध्द कृष्णा याच्यावर बोली लावण्याची शक्यता आहे.