चंद्रशेखर घुगे संभाजीनगरचे जिल्हा क्रीडा अधिकारी

संभाजीनगर(प्रतिनिधी): जिल्हा क्रीडा अधिकारी शरद कचरे हे 31 जुलै 2022 रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यामुळे यानंतरचा पदभार क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
या आधी व्हॉलीबॉल खेळाडू म्हणून यशस्वीपणे नावलौकिक केले आहे. शिवाय ते सक्षमपणे तालुका क्रीडा अधिकारी, संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुलाचा पदभार पार पाडला नेहमी काम करताना हसतमुखाने समोर आलेले काम चौकरित्या पार पाडनारे व्यक्ती म्हणून व्यक्तिमत्व आहे.
क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय आणि राज्य शासनाने नियुक्त करण्यात आली आहे. त्याकरीता औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील विविध जिल्हा संघटना, क्रीडा प्रेमी, खेळाडू व सहकारी यांचेकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. आज दिनांक 01 ऑगस्ट 2022 रोजी श्री. घुगे यांनी कार्यभार स्विकारला. शरद कचरे व चंद्रशेखर घुगे यांचे शुभहस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी हार घालून साजरी करण्यात आली.
Comments are closed.