संभाजीनगर(प्रतिनिधी): ग्रॅपलिंग कमिटी ऑफ महाराष्ट्र व ग्रॅपलिंग कमिटी ऑफ संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 30 व 31 जुलै रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे दुसऱ्या महाराष्ट्र राज्य सब जुनिअर मुले व मुली ग्रॅपलिंग स्पर्धेचे उद्घाटन संजय कनेकर सभापती माढा विभाग यांच्या शुभहस्ते संपन्न झाले उद्घाटन प्रसंगी बोलताना ग्रॅपलिंग कुस्ती खेळ खूप ताकदीचा व वेगवान मनोरंजक असल्याचे या खेळाच्या विकासासाठी सर्वोत्तर मदत करण्याचे आश्वासन देऊन पुढील खासदार चषकात ग्रॅपलिंग व विट्टी दांडू खेळाचा समावेश करण्यात येणार आहे.
याप्रसंगी संभाजीनगर जिल्हा क्रीडा अधिकारी मा. शरद कचरे सर व क्रीडा अधिकारी . चंद्रशेखर घुगे डॉ. भारत खैरनार डॉ. उदय डोंगरे डॉक्टर गजानन वाळके (माजी जिल्हा क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे , स्वप्निल तांगडे , समीर लोखंडे ( युवा मोर्चा शहर अध्यक्ष) ग्रॅपलिंग कमिटी ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. राकेश खैरनार आणि महासचिव प्रा. प्रशांत नवगिरे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे कोषाध्यक्ष प्रतीक्षा नवगिरे सहसचिव सागर मगरे सहसचिव सचिन अत्रे प्रा अविनाश वाडे सदस्य अमिन शहा, संतोष अवचार कृष्णा दाभाडे ,मंगला शिंदे अमोल पगारे अजय नाथाडे , विजय सोनवणे , सुशील अंभोरे या सर्वांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले राज्यभरातून 12 जिल्हयांनी सहभाग नोंदवला
सामान्यचे निकल
11 वर्षा खालील वयोगट
20 kg
1) प्रिया ठेंग – संभाजीनगर
2)अनुराधा शेळके -जालना
3) वेदांती पैठणे – जालना
27 kg
1)आराध्या लोणकर- संभाजीनगर
2)अक्षरा पवार -जालना 3)समृद्धी शेळके- संभाजीनगर
11 वर्षाखालील मुल
22 kg
1)राजवीर बहुले -जालना
2) अलोक सखळकर -संभाजीनगर
3) पंकज धनगर – जालना
27 kg
1) शेख हिजफा – जालना
2) शैलेश पाटील – जालना
3) स्वराज बहुले – जालना