राष्ट्रीय भालाफेक दिनानिमित्त जिल्हास्तरीय भालाफेक स्पर्धेचे आयोजन

संभाजीनगर(प्रतिनिधी): भारताला ऑलम्पिक अथलेटिक स्पर्धेमध्ये पहिले सुवर्णपदक भालाफेक या प्रकारात मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा या खेळाडूचा बहुमान म्हणून भारतीय अथलेटिक महासंघाने सात ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे त्या अनुषंगाने औरंगाबाद जिल्हा अथलेटिक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय भालाफेक दिनानिमित्त जिल्हास्तरीय भालाफेक स्पर्धेचे आयोजन दिनांक 7 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 8.00 वा. सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केली आहे.
ही स्पर्धा औरंगाबाद जिल्हा अथलेटिक असोसिएशन आणि सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली आहे या स्पर्धेत वीस वर्षाखालील मुले व मुली तसेच वीस वर्षावरील मुले व मुली अशा गटांमध्ये होणार आहे तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन औरंगाबाद जिल्हा अथलेटिक असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार श्रीकांत जोशी आणि सचिव डॉ. फुलचंद सलामपुरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी तांत्रिक समिती प्रमुख डॉ. दयानंद कांबळे 91 98348 41618 यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले आहे.
Comments are closed.