• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, August 22, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

आमदार चषक राज्यस्तरीय ज्युनियर ज्यूदो स्पर्धा : दिक्षा खरेला रौप्य, सानिका शेडगे व केतकी गोरेला कांस्य

by pravin
April 22, 2022
in ज्युडो, राज्यस्तरीय
Reading Time: 1 min read
आमदार चषक राज्यस्तरीय ज्युनियर ज्यूदो स्पर्धा : दिक्षा खरेला रौप्य, सानिका शेडगे व केतकी गोरेला कांस्य
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पुणे | महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनच्यावतीने आयोजित आमदार चषक ४८ व्या राज्यस्तरीय ज्युनियर (मुले व मुली) ज्यूदो स्पर्धेत मुलींच्या ५२ किलो खालील गटात ठाण्याच्या शायना देशपांडेने गोंदियाच्या दिक्षा खरेचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. आमदार मुक्ता टिळक या स्पर्धेच्या संयोजिका आहेत.

टिळक रोड येथिल महाराष्ट्रीय मंडळाच्या हॉलमध्ये आज पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत मुलींच्या ५२ किलो खालील गटात अंतिम लढतीत शायना देशपांडेने केसागातामे कौशल्यावर दिक्षा खरेविरूध्द पूर्ण गुण (इप्पोन) मिळवून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. दिक्षा खरेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

कांस्यपदकाच्या पहिल्या लढतीत पुणे जिल्हा ज्यूदो असोसिएशनच्या (पीडीजेए) सानिका शेडगेने धुळ्याच्या गुंजन पाटीलचा पराभव केला. दुसºया कास्यपदकाच्या लढतीत नागपूरच्या केतकी गोरेने वर्धाच्या दिक्षा माडवीला नमवित कास्यपदक आपल्या नावावर केले.
तत्पूर्वी, असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा. राजकुमार पुनकर व स्पर्धेचे निरिक्षक अनिल सपकाळ यांंच्या हस्ते श्री हनुमान देवता यासह ज्यूदो खेळाचे संंस्थापक डॉ जिगोरो कानो, भारतीय ज्यूदोचे संस्थापक कै. रघुनाथ खानिवालेसर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनचे महासचिव शैलेश टिळक, तांत्रिक समितीचे सचिव दत्ता आफळे, असोसिएशनचे वरिष्ठ पद्धिकारी, भाजपा कसबा मतदार संंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, राजेंद्र काकड, छगन बुलाखे, सरचिटणीस अ‍ॅड. राणीताई कांबळे, कसबा महिला आघाडीच्या अध्यक्षा आश्विनी पांडे, युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित कंक उपस्थित होते.

Tags: Latest sports newslatest sports news marathiMarathi sports newsSports news live
ShareTweetSend
Next Post
राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा करता निवड चाचणीचे आयोजन

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा करता निवड चाचणीचे आयोजन

ताज्या बातम्या

ट्रीसा-गायत्रीची ऐतिहासिक झेप; चीनच्या चौथ्या मानांकित जोडीला धक्का, भारताचे पदक निश्चित!

ट्रीसा-गायत्रीची ऐतिहासिक झेप; चीनच्या चौथ्या मानांकित जोडीला धक्का, भारताचे पदक निश्चित!

खेळाची प्रतिमा उंचावण्यासाठी अजितदादांची परंपरा पुढे चालवणार : उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार

खेळाची प्रतिमा उंचावण्यासाठी अजितदादांची परंपरा पुढे चालवणार : उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार

सात्विक-चिरागची जबरदस्त ‘कमबॅक’ एन्ट्री; मलेशियन जोडीला नमवत उपांत्यपूर्व फेरीत!

सात्विक-चिरागची जबरदस्त ‘कमबॅक’ एन्ट्री; मलेशियन जोडीला नमवत उपांत्यपूर्व फेरीत!

नेव्हिल डिसोझा मैदानावरून संघर्ष तीव्र; ‘हा लढा सुरू करावा लागेल’ – आदित्य ठाकरे

नेव्हिल डिसोझा मैदानावरून संघर्ष तीव्र; ‘हा लढा सुरू करावा लागेल’ – आदित्य ठाकरे

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.