• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 20, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

‘महाराष्ट्र केसरी’ जिंकणाऱ्या पृथ्वीराज पाटीलबाबत जे घडलंय ते आख्ख्या राज्यासाठी लज्जास्पद!

by pravin
April 11, 2022
in बातम्या, महाराष्ट्र केसरी कुस्ती
पृथ्वीराज पाटील 2021-22 ‘महाराष्ट्र केसरी’, जिंकली मानाची गदा! विशाल बनकर पराभूत
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

कोल्हापूरचा रांगडा मल्ल पृथ्वीराज पाटीलने शनिवारी (दि. ०९ एप्रिल) साताऱ्यातील शाहू क्रीडा संकुलात जिल्ह्यात पार पडलेल्या ६४व्या ‘महाराष्ट्र केसरी‘ कुस्ती स्पर्धेचा किताब पटकावला. त्याने विशाल बनकरचा ५-४ असा जवळचा पराभव केला. पृथ्वीराजने त्बल २१ वर्षांनंतर कोल्हापूरला ही गदा मिळवून दिली. मात्र, यावेळी त्याने एक मोठी खंत व्यक्त केली. जेव्हाही मल्ल ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावतात, तेव्हा त्यांच्यावर मोठ-मोठ्या बक्षिसांचा पाऊस पडतो. मात्र, यंदा असं काहीही घडलं नाही.

फक्त १९ वर्षांच्या वयात ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावण्याचा कारनामा पृथ्वीराजने करून दाखवला. मात्र, त्याला विजयाची गदा तर मिळालीच, पण बक्षीस काहीच मिळालं नसल्याची बातमी सर्वत्र पसरली. जागतिक कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या सोनबा गोंगाने या मल्लानेही यावर आपले मत मांडले. तो म्हणाला की, “हे मल्ल गरीब कुटुंबातून येतात. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख रक्कम दिली पाहिजे.”

शंभुराज देसाईंचे मोठे वक्तव्य
पृथ्वीराज पाटीलला बक्षीस न मिळाल्याबद्दल गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले की, “पृथ्वीराज पाटील यांना बक्षीस का दिले गेले नाही, याची माहिती घेतली जाईल.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “मल्ल हे खूप मेहनतीने किताब मिळवतात. जर बक्षीस देण्याची जबाबदारी शासनाची असेल, तर शासनाकडून बक्षीस नक्कीच दिलं जाईल. मात्र, जर ही जबाबदारी आयोजकांची असेल, तर आयोजकांना सूचना दिल्या जातील. बक्षीस न देणे ही मोठी चूक आहे.”

काल पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज पाटील यांना काही कारणामुळे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळण्यास विलंबाबाबतीत मी तात्काळ दखल घेऊन कै. शिवाजीराव चँरीटेबल ट्रस्टच्या वतीने दोन लाखाचा धनादेश आजच पृथ्वीराज पाटील यांच्या मूळगावी रवाना केला आहे.

कै. शिवाजीराव चँरीटेबल ट्रस्टच्या वतीने दोन लाखाचा धनादेश आजच पृथ्वीराज पाटील यांच्या मूळगावी रवाना केला आहे. pic.twitter.com/rc8Qnvlg8F

— Shambhuraj Desai (@shambhurajdesai) April 10, 2022

 

Tags: Maharashtra KesariPrithviraj Patil 2021-22 ‘Maharashtra KesariWhat happened to Prithviraj Patil who won 'Maharashtra Kesari' is shameful for the entire state!
ShareTweetSend
Next Post
क्रिस्टियानो रोनाल्डोला राग अनावर;व्हिडिओ व्हायरल

क्रिस्टियानो रोनाल्डोला राग अनावर;व्हिडिओ व्हायरल

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.