क्रिस्टियानो रोनाल्डोला राग अनावर;व्हिडिओ व्हायरल

स्टार फुटबाॅपटू क्रिस्टियानो रोनाल्डोचा संघ मॅनचेस्टर युनायटेडला नुकताच एवर्टनविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. सामना समाप्त झाल्यानंतर रोनाल्डो जेव्हा मैदानातून बाहेर जात होता, तेव्हा तो चांगलाच भडकल्याचे दिसला. त्याने रागाने एका चाहत्याचा फोनच तोडला. आता रोनाल्डोने आपल्या आशा कामगिरीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) ओल्ड ट्रेफर्ड मैदानात शनिवारी (९ एप्रिल) आपल्या चाहत्याचा फोन फोडला, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रोनाल्डो लंगडत चालला असल्याचे दिसत आहे. कारण, सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्याने ज्या चाहत्याचा फोन फोडला, तो त्याचा व्हिडिओ काढत होता. आता रोनाल्डोने इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली आहे, ज्यामध्ये त्याने चाहत्याची माफी मागितली आहे. त्याने लिहिले की, “माझ्या रागासाठी माफी मागतो. तसेच, त्या चाहत्याला सामना पाहण्यासाठी मी बोलावेल.”

 

तसेच, तो सामन्याबद्दल म्हणाला की, “आम्ही ज्या पद्धतीच्या समस्येचा सामना करत आहे, अशामध्ये भावना हाताळणे सोपे नसते. तरीही ज्यांना हा खेळ आवडतो, त्या सन्मानकारक, संयमित आणि युवांसाठी उदाहरण सांगण्यासारखे असायला हवे.”

मॅनचेस्टर युनायटेड संघाला खराब खेळीचा सामना करावा लागला आहे. संघाला एवर्टनविरुद्ध विजयाची गरज होती, परंतु असे झाले नाही. सध्या मॅनचेस्टर युनायटेड गुणतालिकेत ७व्या क्रमांकावर आहे आणि चॅम्पियन लीगमध्ये क्वालिफाय होण्यासाठी ६ अंक मागे आहे. गुडिसन पार्कमध्ये झालेल्या सामन्यात एँथनी गार्डनमुळे एवर्टनला विजय मिळाला. ते युनायटेडवर पुढील हंगामात चॅम्पियन लीगमध्ये क्वालिफाय होईल की, नाही याचा धोका निर्माण झाला आहे.

क्रिस्टियानो रोनाल्डो हा फुटबाॅल खेळातील प्रसिद्ध खेळाडू आहे. तो एका गरीब कुटुंबात जन्मलेला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय फुटबाॅलसाठी निवड १८व्या वर्षीच झाली होती. खूप कमी काळात त्याने लोकांच्या मनात जागा मिळवली. तो सध्या फुटबाॅलमधील प्रसिद्ध खेळाडू आहे. तसेच तो जगातील श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे.

You might also like

Comments are closed.