• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

क्रिकेटमधील दोन नियम बदलल्यानंतर; सचिन तेंडुलकर म्हणाला

by pravin
March 11, 2022
in क्रिकेट
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

दोन दिवसापूर्वी क्रिकेट चे काही नियम बदलण्यात आलेले आहेत. नियम एमसीसी’ म्हणजेच मेरिलिबोन क्रिकेट क्लबने आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमांमध्ये नव्या बदलांची घोषणा केली आहे.

पाहुयात काय बदल आहेत नियमांमध्ये-

क्रिकेटमधील दोन नियम बदलल्यानंतर सचिन तेंडुलकर म्हणाला, “मंकडिंग धावचीत आणि झेल बाद झाल्यानंतर…

 

एमसीसी’ म्हणजेच मेरिलिबोन क्रिकेट क्लबने आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमांमध्ये नव्या बदलांची घोषणा केली आहे. ‘मंकडिंग’ला धावचीत घोषित करणे, चेंडूची लकाकी वाढवण्यासाठी लाळेच्या वापरास पूर्णत: बंदी आदी अनेक बदल १ ऑक्टोबरपासून अमलात येणार आहेत. म्हणजेच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नव्या नियमांनिशी खेळाडूंचा कस लागणार आहे. एमसीसी ही संस्था क्रिकेट कायद्यांचे संरक्षक आहे. मंकडिंग बाद, लाळेचा वापर, वाइड बॉल आणि डेड बॉलसह अनेक नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. हे सर्व नियम यावर्षी १ ऑक्टोबरपासून लागू होतील.

नक्की वाचा सचिन तेंडुलकर काय म्हणाले-

या नियमांबाबत मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेट देव म्हणून ख्याती असलेल्या सचिन तेंडुलकर यांनीही याला सहमती दर्शवली आहे.

 

सचिन तेंडुलरकर यांनी सांगितले की, “एमसीसी समितीने नवीन नियम जारी केले आहेत. मी यापैकी काही नियमांचे समर्थन करतो. पहिला नियम म्हणजे मंकडिंग आउट आहे. यापूर्वी मंकडिंग हा शब्द वापरल्याने मला नेहमीच अस्वस्थ वाटले आहे. मात्र याचे रूपांतर आता धावबादमध्ये झाले याचा मला खूप आनंद आहे. माझ्या मते धावबाद असायलाच हवा, त्यामुळे आमच्यासाठी ही आनंदाची बाब आहे. तर दुसरा नियम बॅटर झेलबाद झाल्यानंतर मिळणाऱ्या स्ट्राइकबाबतचा आहे. नव्या नियमामुळे झेल पकडताना दोन्ही खेळाडूंनी धाव घेतली आणि झेलबाद झाला. तरी नव्या फलंदाजाला फलंदाजीसाठी स्ट्राइक यावं लागेल. हा नियम अगदी बरोबर आहे, कारण एखाद्या गोलंदाजाने गडी बाद केला तर त्याला नवीन फलंदाजाला गोलंदाजी करून विकेट घेण्याची संधी मिळेल.

असं म्हणून सचिन तेंडुलकरने व्यक्त केल.

क्रिकेटमध्ये इतिहासात १९४८मध्ये ‘मंकडिंग’नुसार प्रथम धावचीत केल्याची नोंद आढळते. भारताचे माजी क्रिकेटपटू विनू मंकड यांनी ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक-फलंदाज बिल ब्राऊन यांना, त्यांनी नॉन-स्ट्रायकरला क्रीझ सोडली असताना या पद्धतीने धावचीत केले होते. मंकड यांनी ब्राऊन याला आधी अनेकदा ताकीदसुद्धा दिली होती. ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी या प्रकाराला ‘मंकडिंग’ असेच नाव दिले. या पद्धतीने बाद करणे हे खेळभावनेच्या विरोधातील असे मानले गेल्याने सुनील गावस्कर यांनी त्याला विरोध दर्शवला होता. त्यानंतर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी चार, तर ट्वेन्टी-२० आणि महिला क्रिकेटमध्ये एकेक ‘मंकडिंग’च्या घटना घडल्या होत्या. २०१९च्या ‘आयपीएल’मध्ये फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने जॉस बटलरला ‘मंकडिंग’ पद्धतीने बाद केल्यामुळे वाद निर्माण झाला होता.

 

 

 

Tags: ChangeCricketRulesTwo
ShareTweetSend
Next Post

सिंधू, सायनाचे आव्हान संपुष्टात;

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.