सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान प्रिमियर लीग सुरु आहे. भारतामध्ये ज्या प्रमाणे आयपीएल लोकप्रिय आहे त्याचप्रमाणे ही पाकिस्तानमधील क्रिकेट स्पर्धा असून सोशल मीडियावरही याची तुफान चर्चा दिसून येत आहे.
मात्र या स्पर्धेची चर्चा सध्या भारतामध्ये आहे कारण या स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचं दर्शन झालंय. नाही, नाही तुम्ही समजताय तसं नाहीय. विराट या स्पर्धेत प्रत्यक्ष खेळण्यासाठी गेला नाहीय किंवा तो पाकिस्तानमध्येही नाहीय. तर विराटचं दर्शन पीएसएलमध्ये झालंय ते एका चाहत्याने पकडलेल्या पोस्टरच्या माध्यमातून
पाकिस्तानमधील एका क्रिकेट चाहत्याने कोहलीचं पोस्टर सामन्यादरम्यान झलकावल्यानंतर त्याचा फोटो व्हायरल झालाय. या पोस्टवर विराटने पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळावं अशी इच्छा व्यक्त केलीय. पाकिस्तानमध्ये झळकलेल्या विराटच्या या पोस्टवर पाकचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनेही प्रतिक्रिया दिलीय.