औरंगाबाद (प्रतिनिधी): इस्तंबुल ( तुर्की ) येथे २२ ते २७ फेब्रुवारी २०२२ दरम्यान होणाऱ्या जागतिक रँकिंग कुस्ती स्पर्धेसाठी जागतिक कुस्ती संघटना आणि भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नवनाथ ढमाळ यांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड झालेली आहे.
जागतिक कुस्ती संघटनेचे ग्रेड १ चे अधिकृत आंतरराष्ट्रीय पंच आहे. आणि त्यांनी जागतिक व आशियाई कुस्ती स्पर्धेत अनेक ठिकाणी त्यांनी तांत्रिक अधिकारी म्हणून काम पहिले आहे .
महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार , सरचिटणीस प्रा. बाळासाहेब लांडगे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ,पुणे , कार्याध्यक्ष पै. नामदेवराव मोहिते , उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे ,महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख उपमहाराष्ट्र केसरी पै. संपतराव साळूंखे यांनी अभिनंदन केले आहे.