• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 20, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

महाराष्ट्र खुली टेनिस स्पर्धात बोपण्णा-रामनाथन जोडीचा विजय;

by pravin
February 3, 2022
in लॉंग टेनिस
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पुणे – रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन या द्वितीय मानांकित भारतीय जोडीने टाटा महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेची विजयी सलामी दिली.

बोपण्णा-रामनाथन जोडीने अमेरिकेच्या जेम्स सेरेटानी आणि निकोलस मोनरो जोडीचे आव्हान ६-३, ३-६, १०-७ असे परतवून लावले. गुरुवारी उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा अलेक्झांडर एर्लेर आणि जिरी वेस्ली जोडीशी सामना होईल.

युकी भांब्री आणि दिविज शरण या भारतीय जोडीला मात्र पराभव पत्करावा लागला. भारताच्याच साकेत मायनेनी आणि शशीकुमार मुकुंद जोडीने युकी-दिविज जोडीला ६-३, ६-४ असे सरळ सेटमध्ये नमवले. युकी-दिविजचा आधी डेनिस नोव्हाक आणि जाओ सौसा या जोडीशी सामना रंगणार होता. मात्र, डेनिसच्या मांडीला दुखापत झाल्याने या जोडीला माघार घ्यावी लागली आणि त्यांच्या जागी मायनेनी-मुकुंद जोडीला मुख्य फेरीत प्रवेश मिळाला.

डेव्हिस चषक लढतीसाठी नागलऐवजी युकी

पुढील महिन्यात डेन्मार्कविरुद्ध होणाऱ्या जागतिक गट-१ प्ले-ऑफ डेव्हिस चषक टेनिस लढतीसाठी भारताच्या पाच सदस्यीय संघातून सुमित नागलला वगळण्यात आले आहे. भारताच्या संघात रामकुमार रामनाथन (जागतिक क्रमवारीत १८२वे स्थान), प्रज्ञेश गुणेश्वरन (२२८) आणि युकी भांब्री (८६३) या एकेरीच्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय रोहन बोपण्णा आणि दिविज शरण दुहेरीत खेळतील, असे अखिल भारतीय टेनिस संघटनेने सांगितले. साकेत मायनेनी आणि दिग्विजय प्रताप सिंह हे दोन राखीव खेळाडू असतील. जैव-सुरक्षा परिघातील दिल्ली जिमखाना क्लबवर ४ आणि ५ मार्चला हा सामना होईल.

Tags: maharashtraopen tennisTOURNAMENT
ShareTweetSend
Next Post

कोरिया रिपब्लिकची अंतिम फेरीत धडक

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.