जळगाव-अमरावती येथे 20 वी ज्युनियर राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय स्पर्धेत जळगाव तालुक्यातील चोपडा येथील अष्टविनायक स्पोर्ट्स क्रिकेट क्लब चा महिला संघ सहभागी झाला होता. या संघात संकट शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या पंकज कला व विज्ञान महाविद्यालय, येथील दोन महिला खेळाडू कामिनी पाटील आणि पूजा पाटील या सहभागी झाल्या होत्या. या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून आलेल्या संपूर्ण संघामधून चोपडा येथील संघ उपविजेता झाला.
या स्पर्धेत दोघा महिला खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यामुळे या दोघांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली असून सदर राष्ट्रीय स्पर्धेत कामिनी व पूजा सहभागी होण्यासाठी 22 ते 26 सप्टेंबर 2021 दरम्यान जम्मू काश्मीर येथे जाणार आहे.राष्ट्रीय स्पर्धेत या दोघा महिला खेळाडूंची निवड झाल्याबद्दल त्यांचे पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश बोरेले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोर पाठक, क्रीडा संचालक प्राचार्य डॉक्टर विजय पाटील तसेच ग्रामस्थांच्यावतीने कौतुक व सत्कार होत आहे. व दोघींना पुढील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा दिले आहेत.