आयपीएल मध्ये हैदराबाद समोर दिल्लीचे आवाहन होते. यामध्ये दिल्लीने एकतर्फी सामन्यात गोलंदाजाच्या चांगल्या कामगिरीच्या बळावर हैदराबादला पराभूत केले. या दणदणीत विजयाचा दिल्लीने पॉइंट टेबल मध्ये अव्वल स्थान गाठले आहे. दिल्लीच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करून हैदराबादला फक्त 134 धावांपर्यंतच मजल मारता आली.
प्रतिनिधी-नाणेफेक जिंकून हैदराबादने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र त्याचा हा निर्णय अंगलट पडला. हैदराबाद कडून एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही, त्यामुळे त्यांना मोठा स्कोर उभा करता आला नाही. हैदराबाद कडून अब्दुल समद यांचे 28 तर राशिद खान ने 22 धावा केल्या. दिल्लीकडून कागिसो रबाडा नितीन तर अक्षर पटेल व एनरीचने प्रत्येकी दोन गडी बाद केल्या. धावांचा पाठलाग करीत असताना दिल्लीचेही सुरुवात चांगली झाली नाही. पृथ्वी शौ अवघ्या 11 धावा करून तंबूत. मात्र त्यानंतर शिखर धवन व श्रेयस अय्यर ने संघाचा डाव सावरला. श्रेया सय्यद 42 धावा करून बाद झाला. नंतर श्रेयस अय्यर व कर्णधार रिषभ पंत ने संघाला कोणतीही अडचण होऊ दिली नाही. श्रेयस अय्यर 47 तर कर्णधार पंत ने 35 धावांचे योगदान दिले. हैदराबाद कडून खलील अहमद वर रशीद खान ने एक गडी बाद केला. उद्या मुंबई इंडियन्स समोर कोलकाता चे आव्हान असणार आहे.
एनरिच ठरला सामनावीर, त्याने चार शटकांमध्ये फक्त 12 धावा देत डेव्हिड वॉर्नर सहित दोन गडी बाद केले.