औरंगाबाद (प्रतिनिधी)-महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणूक २४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती यामध्ये सन २०२१ ते २०२५ निवडणुकी करिता आयोजन करण्यात आले होते पण कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे या निवडणुकीचे अर्ज ९ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागवण्यात आले होते, १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारांची प्राथमिक यादी छाननी आणि तक्रार निवारण करून निवडणूक अधिकारी यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध केले जाणार होते. यामध्ये अध्यक्ष पदाकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकमेव अर्ज दाखल असल्यामुळे सर्वत्र सोशल मिडिया वर विविध खेळाच्या संघटनेमार्फत अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली अशा पोस्ट व्हायरल होत आहे.

परंतु १३सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आक्षेप स्वीकारल्या जाणार होता आणि १४ सप्टेंबर रोजी प्राथमिक यादीवरील निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत निवारण समितीकडे आलेल्या आक्षेपावरती सुनावणी घेऊन निवडणूक तक्रार निवारण समिती निर्णय घेणार आहे . १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे उमेदवारांना अर्ज मागार घेण्याची वेळ१८ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहील त्याचदिवशी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल नंतर २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणुकीची प्रक्रिया पुणे जिल्हा कृषी विकास प्रतिष्टान मिटिंग हॉल , ई १५ गुलटेकडी, मार्केट यार्ड येथे होणार आहे तसेच एकविध खेळाच्या प्रत्येक राज्यसंघटनेचा एक प्रतिनिधी यासभेस हजर राहू शकणार आहे.
राज्यसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांची यादी खालील प्रमाणे:
