औरंगाबाद- सायकलींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संलग्न सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा 12 सप्टेंबर रोजी सोलापुर धुळे नेशनाल हायवे येथे घेण्यात आल्या.या स्पर्धेत U-16 वयोगटात 14 कि.मी. टाईम ट्रायल सायकलिंग स्पर्धेमध्ये औरंगाबाद च्या भास्कराचार्य प्रतिष्ठान चाटे स्कूल च्या 10 व्या वर्गात शिकणाऱ्या साई अंबेने आपल्या वयोगटात 21 मि. 27 से. टायमिंग देत, द्वितीय क्रमांक पटकावला तसेच पुण्याच्या वीरेंद्र पाटील ने 21 मि 13 से. टायमिंग देत प्रथम तर पुण्याच्याच आदिप वाघ ने 21 मि.28 से. टायमिंग देत तृतिय स्थान पटकाविले.
महाराष्ट्र संघामध्ये स्थान मिळविले तसेच 26 व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी तो पात्र ठरला.औरंगाबाद जिल्ह्यातून रोड सायकलिंग राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरणारा साई अंबे चाटे स्कूल इयत्ता १०वी पहिलाच खेळाडू असून येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत तो चांगली कामगिरी करेल अशी माहिती सायकलींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे संघटक सचिव प्रताप जी जाधव व सचिव संजय साठे व प्रशिक्षक बिरू भोजने यांनी दिली.चाटे स्कूल चे अध्यक्ष गोपीचंद चाटे, सहसचिव सोमीनाथ वाघमारे, मुख्याध्यापक महस्के , क्रीडाशिक्षक सुरेश वारे व संतोष भालेराव, आयन मॅन नितीन घोरपडे व दिल्ली ट्रायथलॉन फिनिशर डॉ. जटाळे, अभय देशमुख, अमृत बिरहाडे यांनी अभिनंदन केले. अशी माहिती सायकलींग असोसिएशन औरंगाबाद जिल्हा संघटनेचे सचिव व राज्य सायकलींग संघटनेचे खजिनदार भिकन अंबे यांनी दिली.