जालना(प्रतिनिधी)- यंग जायंट्स ग्रुप तर्फे दिनांक 2 व 3 ऑक्टोबर रोजी जालना क्रीडा संकुल परिसरात बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.मोबाईल, व्हिडिओ गेम्स यात अडकलेले विद्यार्थी,तरुण मैदानाकडे वळावे, खेळाप्रती जागृती होऊन उत्साह वाढावा या उद्देशाने सदर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे.
सदर स्पर्धा या 10 ते 13,14 ते 17,18 ते 21 आणि 21 पासून पुढे अशा गटात कोविड नियमांचे पालन करत बॅडमिंटनच्या नियमानुसार घेतल्या जाणार आहे.
अधिक माहितीसाठी बॉबी अग्रवाल, अक्षय धोंगडे(जैन),प्रदुम्न मानधना यांच्याशी संपर्क साधून क्रीडा प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यंग जायंट्स ग्रुप च्या अध्यक्षा एडवोकेट अश्विनी धन्नावत यांनी केले आहे.