• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, October 2, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

द.आफ्रिका विरुद्ध भारत कसोटी: पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व! राहुलचे दमदार शतक

by pravin
December 27, 2021
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

सेंच्यूरियन:- दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत  संघात रविवारपासून (२६ डिसेंबर) कसोटी मालिकेला सुरुवात झाली असून पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर होत असलेला हा सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचा नवनियुक्त उपकर्णधार केएल राहुलने शानदार शतक झळकावले. हेेेे शतक पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य राहिले.

 

मयंक-राहुलची दमदार सलामी

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारतीय सलामीवीरांनी योग्य ठरवला आहे. भारताकडून केएल राहुल आणि मयंक अगरवाल हे दोघजण सलामीला फलंदाजी करण्यासाठी उतरले. या दोघांनीही नव्या चेंडूचे आव्हान चांगल्याप्रकारे पेलताना दक्षिण आफ्रिकेला यश मिळू दिले नाही. दोघांनी संघाला ११७ धावांची भागीदारी करून दिली. मयंक अर्धशतक करुन बाद झाल्यानंतर अनुभवी चेतेश्वर पुजारा पहिल्याच चेंडूवर माघारी परतला.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीने राहुलची साथ देत संघाला २०० च्या जवळ नेले. मात्र, लुंगी एन्गिडीच्या एका बाहेर जाणाऱ्या चेंडूला अटक होण्याच्या नादात तो स्लीपमध्ये उभ्या असलेल्या मल्डरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्याने ९४ चेंडूवर ३५ धावा केल्या. यासह त्याचा शतकाचा दुष्काळ आणखी काही दिवस लांबला.

 

राहुलचे अप्रतिम शतक

रोहित शर्माच्या अनुपस्थित भारतीय संघाचा प्रमुख सलामीवीर म्हणून जबाबदारी सांभाळत असलेल्या केएल राहुलने २१८ चेंडूंमध्ये शतक झळकावले. ते त्याच्या कारकिर्दीतील सातवे कसोटी शतक ठरले.

 

राहुल-रहाणेची अभेद्य भागीदारी

विराट बाद झाल्यानंतर संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे राहुलची साथ देण्यासाठी मैदानात उतरला. त्याने आक्रमक सुरुवात केली. या दोघांनी अखेरपर्यंत किल्ला लढवत दिवसाखेर भारताला ३ बाद २७२ धावांपर्यत मजल मारून दिली. राहुल १२२ तर रहाणे ४० धावा काढून नाबाद झाला. दक्षिण आफ्रिकेसाठी लुंगी एन्गिडीने सर्व तीन बळी मिळविले.

Tags: South Africa vs India
ShareTweetSend
Next Post

राष्ट्रीय खो-खो स्पर्धा ;महाराष्ट्र, कर्नाटक, कोल्हापूर विजयी

ताज्या बातम्या

एन-७ मनपा शाळेच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

एन-७ मनपा शाळेच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

गणपती बाप्पा सायकलिंग चॅलेंजचे पारितोषिक वितरण

सायकलिंग चॅलेंज स्पर्धेचे बक्षीस वितरण

राज्यस्तरीय शालेय वुशू स्पर्धेचे छत्रपती संभाजीनगरात उद्घाटन

“राज्यस्तरीय शालेय 17 वर्षांतील मुले व मुलींच्या वुशू क्रीडा स्पर्धाचे थाटात उद्घाटन

लोळगे चषकात स्वरीत दरकचा दुहेरी सन्मान; दीपेश बोर्डे सर्वोत्तम गोलंदाज

लोळगे चषकात स्वरीत दरकचा दुहेरी सन्मान; दीपेश बोर्डे सर्वोत्तम गोलंदाज

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.