• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

टेनिसस्टार सानिया मिर्झाची निवृत्ती..! वाचा केव्हा खेळणार शेवटची मॅच

by pravin
January 19, 2022
in लॉंग टेनिस
टेनिसस्टार सानिया मिर्झाची निवृत्ती..! वाचा केव्हा खेळणार शेवटची मॅच
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

ऑस्ट्रेलियन ओपन २०२२ मध्ये महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर भारताची लोकप्रिय टेनिसपटू सानिया मिर्झाने बुधवारी तिच्या निवृत्तीची घोषणा केली. मिर्झा आणि तिची युक्रेनियन जोडीदार नादिया किचेनोक यांना तमारा झिदानसेक आणि काजा जुवान यांच्या स्लोव्हेनियन संघाकडून एक तास ३७ मिनिटांत ४-६, ६-७(५) असा पराभव पत्करावा लागला. सानिया मिश्र दुहेरीत अमेरिकेच्या राजीव रामसोबत खेळणार आहे.

पराभवानंतर, सानिया मिर्झाने घोषित केले की २०२२ हा तिचा दौर्‍यावरील शेवटचा सीझन असेल आणि तिला तो खरोखर पूर्ण करायचा आहे. “हा माझा शेवटचा सीझन असेल हे मी ठरवले आहे. मला हा पूर्ण सीझन खेळायचा आहे. पण तोवर मी टिकेन की नाही माहित नाही”, असं सानिया मिर्झाने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

त्याची बरीच कारणे आहेत. चला आता मी खेळणार नाही’ इतके हे सोपे नाही. मला असे वाटते की माझ्या कमबॅकला जास्त वेळ लागतो आहे. मला वाटते, माझा मुलगा तीन वर्षांचा आहे. मी त्याच्याबरोबर इतका प्रवास करून त्याला धोक्यात आणत आहे, हे मला लक्षात घेतले पाहिजे. माझे शरीर साथ देत नाहीये. आज माझा गुडघा खरोखरच दुखत होता आणि त्यामुळेच आम्ही हरलो असे मी म्हणत नाही पण मला वाटते की जसजसे माझे वय वाढत आहे तसतसे बरे होण्यास वेळ लागतो आहे,” असंही सानिया पुढे म्हणाली.

सानिया मिर्झा २००३ पासून व्यावसायिक दौऱ्यावर खेळत आहे आणि टेनिसमध्ये अव्वल स्थानावर खेळत असताना त्याला १९ वर्षे झाली आहेत.

Tags: LAST SEASONSANIA MIZATENNIS
ShareTweetSend
Next Post
त्सित्सिपास, सबालेंका यांचा विजयी प्रारंभ ;ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा

त्सित्सिपास, सबालेंका यांचा विजयी प्रारंभ ;ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.