पुणे(प्रतिनिधी): पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग स्पर्धेत अंतिम फेरीत चुरशीच्या सामन्यात मस्किटर्स संघाने तलवार्स संघाचा 13टाय विजयी विरुद्ध 10टाय(574-510) असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत अतितटीच्या शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या अंतिम लढतीत मस्किटर्स संघाने तलवार्स संघाचा 13टाय विजयी विरुद्ध 10टाय (574-510) असा पराभव करून विजेतेपद पटकावले. सामन्यात टेबल टेनिस प्रकारात संजय बामणे, वैशाली सोहोनी, नितीन पेंडसे, अतुल ठोंबरे, शैलेश लिमये, आदित्य पावनगडकर, सार्थक प्रधान, रोहन दळवी, आदित्य गांधी, संदीप साठे, अभिजीत शहा, प्रियदर्शन डुंबरे यांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर मस्किटर्स संघाने तलवार्स संघाचा 6टाय विजयी विरुद्ध 2टाय(232-171) असा पराभव करून आघाडी मिळवून दिली. त्यानंतर टेनिसमध्ये पराग चोपडा, रोहन दळवी, रोनित मुथा, प्रियदर्शन डुंबरे, शैलेश लिमये, अर्णव काळे, अभिजीत शहा, चिन्मय दांडेकर, वेद मोघे, समीर सावळा यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर मस्किटर्स संघाने तलवार्स संघाचा 5टाय विजयी विरुद्ध 2टाय (181-136) असा पराभव करून आपली आघाडी अधिक भक्कम केली.
पण सातव्या लढतीत मस्किटर्सच्या अतुल ठोंबरे व सार्थक प्रधान या जोडीने तलवार्सच्या रोहन जमेनिस व शरयू राव यांचा 30-23 असा पराभव करून संघाचा 2टाय विरुद्ध 6टाय(161-203) अशा फरकाने विजय सुकर केला.
स्पर्धेतील विजेत्या मस्किटर्स संघाला करंडक व पदके अशी आकर्षक पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव सारंग लागू, क्लबच्या कार्यकारिणी समितीचे सदस्य अभिषेक ताम्हाणे, तुषार नगरकर, तन्मय आगाशे आणि रिबाऊंड स्पोर्ट्सचे संचालक व स्पर्धेचे प्रायोजक आलोक तेलंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवेन्द्र चितळे, सिद्धार्थ निवसरकर, मनीष चौबळ, कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते. सिद्धार्थ निवसरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर अभिषेक ताम्हाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
मस्किटर्स वि.वि.तलवार्स-13टाय विजयी विरुद्ध 10टाय(574-510)
टेबल टेनिस: मस्किटर्स वि.वि.तलवार्स-6टाय वि.वि. 2टाय(232-171)(संजय बामणे/वैशाली सोहोनी वि.वि.शिल्पा पांडे/कौस्तुभ देशपांडे 30-16; पराग चोपडा/शिरीष कर्णिक पराभूत वि.रोहन छाजेड/राहुल पाठक 28-30; नितीन पेंडसे/अतुल ठोंबरे वि.वि.तेजस किंजवडेकर/कुणाल भुरट 30-24; शैलेश लिमये/आदित्य पावनगडकर वि.वि.रोहन जमेनिस/मनीष सूर्यवंशी 30-21; सार्थक प्रधान/रोहन दळवी वि.वि.अंकित दामले/आर्य देवधर 30-15; आदित्य गांधी/संदीप साठे वि.वि.मकरंद चितळे/प्रशांत वैद्य 30-09; करण बापट/विनायक भिडे पराभूत वि.ईशान भाले/अविनाश दोशी 24-30; अभिजीत शहा/प्रियदर्शन डुंबरे वि.वि.गिरीश मुजुमदार/अक्षय ओक 30-26);
बॅडमिंटन: मस्किटर्स पराभूत वि.तलवार्स- 2टाय पराभूत वि.6टाय(161-203)(आदित्य गांधी/आदित्य पावनगडकर पराभूत वि.आर्य देवधर/मकरंद चितळे 11-30; पराग चोपडा/आदिती रोडे पराभूत वि.अंकित दामले/तेजस किंजवडेकर 21-30; नैमिश पालेकर/समीर सावळा पराभूत वि.मिहीर आपटे/अविनाश दोशी 29-30; रोनित मुथा/विनायक भिडे पराभूत वि.ईशान भाले/प्रशांत वैद्य 14-30; संदीप साठे/स्वरूप कुलकर्णी पराभूत वि.गिरीश मुजुमदार/अक्षय ओक 28-30; शैलेश लिमये/सचिन जोशी पराभूत वि.राहुल पाठक/वेदांत खटोड 28-30; अतुल ठोंबरे/सार्थक प्रधान वि.वि.रोहन जमेनिस/शरयू राव 30-23; वेद मोघे/रोहन दळवी वि.मनीष शहा/हरीश अय्यर ).
इतर पारितोषिके:
मोस्ट व्हॅल्यूएबल महिला खेळाडू: राधिका इंगळहाळीकर;
मोस्ट व्हॅल्यूएबल युवा खेळाडू: इरा आपटे;
मोस्ट व्हॅल्यूएबल वरिष्ठ खेळाडू: शिरीष कर्णिक;
उत्कृष्ट जोडी: केदार व प्रांजली नाडगोंडे;
स्पर्धेतील आवडता खेळाडू: विराज खानविलकर;
प्लेयर विथ मोस्ट इम्पॅक्ट: ईशान भाले व रोहन छाजेड;
मोस्ट स्टायलिश खेळाडू: सार्थक प्रधान;
मोस्ट स्पोर्टिंग टीम: कुकरीज;
मोस्ट डिसीप्लिन टीम: किर्रपान्स;
मोस्ट ग्लॅमरस टीम: लान्सर्स;
मॅक्झिमम टाय जिंकणारा संघ: मस्किटर्स;
टेबल टेनिस प्लेयर ऑफ द टूर्नामेंट : सचिन बेलगलकर;
टेनिस प्लेयर ऑफ द टूर्नामेंट : रोहन दळवी;
बॅडमिंटन प्लेयर ऑफ द टूर्नामेंट: अनिकेत शिंदे;
प्लेयर ऑफ द टूर्नामेंट : पराग चोपडा.