• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

स्मृती मानधनानं राखली भारताची लाज; नक्की वाचा

by pravin
January 24, 2022
in क्रिकेट
स्मृती मानधनानं राखली भारताची लाज; नक्की वाचा
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना हिची आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे. स्मृतीला दुसऱ्यांदा हा सन्मान मिळाला आहे. यापूर्वी २०१८ मध्ये तिला हा पुरस्कार मिळाला होता. पुरुष गटात यावर्षी कोणत्याही भारतीय खेळाडूला कोणत्याही प्रकारात पुरस्कार जिंकता आलेला नसून, भारताच्या एकाही खेळाडूला आयसीसीच्या एकदिवसीय आणि टी-२० संघात स्थानही मिळवता आले नाही.

स्मृतीने गेल्या वर्षी २२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३८.८६च्या सरासरीने ८५५ धावा केल्या होत्या. गेल्या वर्षीही तिने एक शतक आणि ५ अर्धशतके झळकावली होती. गेले वर्ष भारतीय संघासाठी चांगले गेले नव्हते, पण स्मृतीची बॅट तळपत होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताने घरच्या मैदानावर ८ पैकी फक्त दोनच सामने जिंकले. या दोन्ही सामन्यात संघाच्या विजयात स्मृतीने महत्त्वाची भूमिका बजावली.

इंग्लंडचा कसोटी कप्तान जो रूटला आयसीसीचा कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर (पुरुष) म्हणून घोषित करण्यात आले. त्याने गेल्या वर्षी १५ कसोटी सामन्यांमध्ये ६ शतकांच्या मदतीने १७०८ धावा केल्या होत्या. रूटने या पुरस्कारासाठी भारताचा ऑफस्पिनर आर अश्विनसह ३ खेळाडूंना मागे सोडले. श्रीलंकेचा कसोटी कर्णधार दिमुथ करुणारत्ने आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसन हेही बक्षीसाच्या शर्यतीत होते.

तर बाबर आझम २०२१मधील एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू (पुरुष) ठरला. गेल्या वर्षी ६ वनडे सामन्यात २ शतकांच्या मदतीने बाबरने ४०५ धावा केल्या होत्या. त्याने बांगलादेशचा शाकिब अल हसन, आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग आणि दक्षिण आफ्रिकेचा जानेमन मलान यांना मागे टाकले.

Tags: CRICKETERS OF THE YEARICCIndain WomenSMIRITI MANDHANAsport
ShareTweetSend
Next Post
१२ फुटबॉलपटू करोनाबाधित ;चायनीज तैपेईविरुद्धचा सामना रद्द

१२ फुटबॉलपटू करोनाबाधित ;चायनीज तैपेईविरुद्धचा सामना रद्द

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.