• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 20, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

नक्की वाचा; काय म्हणाला क्रिकेटचा देव

by pravin
February 24, 2022
in क्रिकेट
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

बेंगळुरू – सचिन तेंडुलकर एका जाहिरातीप्रकरणी चर्चेत आला आहे.क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकर सध्या खोट्या जाहिरातींमुळे हैराण झाला आहे. सध्या त्याचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो कॅसिनोची जाहिरात करताना दिसत आहे. सचिनने या प्रकरणावर म्हटले की, मी अशा गोष्टींना कधीही दुजोरा दिला नाही आणि या जाहिराती खोट्या आहेत. सचिन आता अशा लोकांवर कायदेशीर कारवाईही करणार आहे.

 

कसिनोच्या जाहिरातीबाबत स्पष्टीकरण देताना सचिनने म्हटले, माझ्या लक्षात आले आहे, की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक जाहिराती दाखवल्या जात आहेत, ज्यामध्ये माझा चेहरा मॉर्फिंगद्वारे कसिनोची जाहिरात करताना दाखवण्यात आला आहे. मी वैयक्तिकरित्या दारू, जुगार किंवा तंबाखूचे कधीही समर्थन केले नाही, परंतु माझ्या फोटोंचा गैरवापर दुःखदायक आहे.

सचिनने दोन दशके जागतिक क्रिकेटवर राज्य केले. त्याने सर्व फॉरमॅटमध्ये ३४,३५७ धावा केल्या आहेत. या प्रकरणात श्रीलंकेचा कुमार संगकारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने जवळपास २८ हजार धावा केल्या आहेत.

सचिनने २०१३मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याचा विक्रम आतापर्यंत एकाही फलंदाजाला मोडता आलेला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. सचिनने वनडेमध्ये ४९ आणि कसोटीत ५१ शतके झळकावली आहेत. २०१९ मध्ये, सचिनला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले. हा बहुमान मिळवणारा तो सहावा भारतीय खेळाडू आहे. क्रिकेट विश्वातील अभूतपूर्व योगदानासाठी सचिनला भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

Tags: Cricketsachin tendulkar
ShareTweetSend
Next Post

श्रीलंकेनं जिंकला टॉस;भारताकडून ‘या’ खेळाडूचं पदार्पण!

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.