लखनऊ – आज लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळवला जातोय सामना,भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना खेळला जात आहे.भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत २२ टी-२० सामने खेळले गेले आहेत.यापैकी भारताने १४ सामने जिंकले आहेत, तर ७ सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. घरच्या ठिकाणी भारताने श्रीलंकेविरुद्ध १० सामने खेळले आहेत. यापैकी त्यांनी ८ सामने जिंकले आहेत. या सामन्यात श्रीलंकेचा कप्तान दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सूर्यकुमार यादव आणि दीपक चहर हे खेळाडू दुखापत झाल्यामुळे टी-२० मालिकेबाहेर आहेत. केएल राहुलही दपखापतग्रस्त झाला आहे. विराट कोहली, ऋषभ पंत यांना बीसीसीआयने ब्रेक दिला आहे. आता भारताकडे १६ जणांचा संघ आहे.
दोन्ही संघाचे 11 प्लेयर्स-
भारत – ऋतुराज गायकवाड, रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन, व्यंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह.
श्रीलंका – पाथुम निसांका, कामिल मिश्रा, चरित असलांका, दिनेश चंडीमल (विकेटकीपर), जेनिथ लियानागे, दासुन शनाका (क), चमिका करुणारत्ने, जेफ्री वांडरसे, प्रवीण जयविक्रमा, दुष्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा.