छत्रपती संभाजीनगर : यंग रनर्स फाउंडेशनचे सचिव भाऊसाहेब गवळी आणि धावपटू वर्षराज शिंदे यांनी जर्मनीतील प्रतिष्ठित BMW Berlin Marathon यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यांच्या या कामगिरीबद्दल शहरातील धावपटू आणि क्रीडा क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
BMW Berlin Marathon ही World Marathon Majors मालिकेतील एक स्पर्धा आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन अंतिम रेषा पार करणे हा दोघांसाठी अभिमानाचा क्षण ठरला. गवळी यांनी आपली पहिली World Marathon Major यशस्वीरीत्या पूर्ण केली.
यंग रनर्स फाउंडेशनचे सदस्य आणि क्रीडा क्षेत्रातील मित्रपरिवाराने गवळी व शिंदे यांचे अभिनंदन केले. त्यांच्या कामगिरीमुळे छत्रपती संभाजीनगरच्या धावपटूंच्या यशात आणखी एक भर पडली आहे.





