• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, October 1, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

बिशनसिंग बेदींच्या तोडीचा फिरकीपटू तयार झाला नाही : बलविंदरसिंग संधू

by pravin
September 28, 2026
in क्रिकेट, खेळ ( सांघिक ), जिल्हास्तरीय, स्पर्धा
Reading Time: 1 min read
बिशनसिंग बेदींच्या तोडीचा फिरकीपटू तयार झाला नाही : बलविंदरसिंग संधू
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर | सतीश अन्वेकर  महान खेळाडू बिशनसिंग बेदी यांची जागा भरून काढणारा तसा तोलामोलाचा निष्णात स्पिनर तयार होऊ शकला नाही.मनिंदरसिंग यांनी भरपूर सामने खेळत विकेट्स घेतल्या पण बेदींची कसर इतरांना भरून काढणे अशक्य होते,असे मत देशाचे माजी कसोटीपटू बलविंदरसिंग संधू यांनी सांगितले.आंतरशालेय लोळगे चषक क्रिकेट स्पर्धेचे एन- मैदानावर त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले असता संधू यांनी क्रीडा पत्रकारांशी संवाद साधला.1983 च्या विश्वचषक फायनलमध्ये त्यांनी वेस्ट इंडिजच्या गार्डन ग्रिनीजला बाद करत या विश्वविजयाचा पाया रचला होता.पुढे बोलताना ते म्हणाले वर्तमान भारतीय संघात अनुभवी ऋषभ पंतसह इशान किशन,संजू सॅमसन,ध्रुव जुरेलसारखे शानदार यष्टीरक्षक आहेत,याचा टीम इंडियाला भरपूर लाभ होत असून एकाचवेळेस तीन यष्टीरक्षक सामने खेळत असल्याने संघाचे यष्टीरक्षक व फलंदाजीही तगडी होत आहे. भारताचा संघ सध्या कॅरेबियन बेटावर सलग दोन मॅचेस जिंकला.ज्यात कोहलीच्या विराट खेळीचा अनुभव दिसला तर शुभमन गिल हा विदेशात आणखीच तंत्रशुद्ध दिसला.विराट आणि रोहित शर्माच्या निवृत्तीची घाई करू नका,त्यांना वनडे,कसोटीत जास्तीत जास्त खेळवणेच संघ हिताचे असल्याचे संधू यांनी सांगितले.

भारताकडून खेळणे एक संधी

भारतीय संघाकडून खेळणे मोठी संधी असते.माझ्याच मार्गदर्शनाखाली येथील
इक्बाल सिद्दीकी महाराष्ट्राकडून दीर्घकाळ खेळला,त्याला जरी एकाच कसोटीत संधी मिळाली तरी इक्बाल आयपीएल सामनाधिकारी व मिळेल ती सेवा बजावत आहे. संजय बांगरने तर 39 कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व करत आपली परिपक्वता सिद्ध करत मेन्टाॅर म्हणून यशस्वीपणे काम केले आहे.कोणत्याही खेळाडूने संधीचे सोने करावे व सर्वोच्च कामगिरीसाठी झोकून देण्याचा सल्ला त्यांनी दिला.

अंकित बावणेला मिळावी संधी

छत्रपती संभाजीनगर येथील अंकित रामदास बावणे याने रणजी सामन्यात भरपूर धावा केल्या आहेत,ज्याप्रमाणे केदार जाधवला धोनीने संधी दिली तशी बावणेलाही मिळावी.जालन्याचा विजय झोल याचा निवडसमितीला कसा विसर पडतो?असा प्रश्नही संधू यांनी उपस्थित केला .कपिलदेव यांनी मला मोलाचे मार्गदर्शन करत आक्रमक क्रिकेटचे तंत्र शिकवले.आगामी वनडे वर्ल्ड कपचा भारतीय संघ मजबूत दावेदार असल्याचेही संधू म्हणाले.

Tags: अंकित बावणेआंतरशालेय क्रिकेटछत्रपती संभाजीनगरफिरकी गोलंदाजीबलविंदरसिंग संधूबिशनसिंग बेदीभारतीय क्रिकेटलोळगे चषक
ShareTweetSend
Next Post
यंग रनर्सच्या दोन धावपटूंची बर्लिन मॅरेथॉनमध्ये उल्लेखनीय कामगिरी

यंग रनर्सच्या दोन धावपटूंची बर्लिन मॅरेथॉनमध्ये उल्लेखनीय कामगिरी

ताज्या बातम्या

एन-७ मनपा शाळेच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

एन-७ मनपा शाळेच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

गणपती बाप्पा सायकलिंग चॅलेंजचे पारितोषिक वितरण

सायकलिंग चॅलेंज स्पर्धेचे बक्षीस वितरण

राज्यस्तरीय शालेय वुशू स्पर्धेचे छत्रपती संभाजीनगरात उद्घाटन

“राज्यस्तरीय शालेय 17 वर्षांतील मुले व मुलींच्या वुशू क्रीडा स्पर्धाचे थाटात उद्घाटन

लोळगे चषकात स्वरीत दरकचा दुहेरी सन्मान; दीपेश बोर्डे सर्वोत्तम गोलंदाज

लोळगे चषकात स्वरीत दरकचा दुहेरी सन्मान; दीपेश बोर्डे सर्वोत्तम गोलंदाज

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.