• बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
Sunday, November 15, 2026
  • Login
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result
Home अन्य खेळ

मल्लखांब वर्ल्ड कप अनुदान वाद: चौकशी अहवाल समोर, उपसंचालकांकडून स्पष्ट भूमिका नाही; क्रीडामंत्री सुनीत्राताई पवार कारवाई करणार का?

२५ लाखांच्या शासकीय अनुदानाच्या वापरावर चौकशी समितीचे गंभीर निरीक्षण; 'देणगी' म्हणून निधी वर्ग, निविदा प्रक्रिया आणि खर्चाच्या कागदपत्रांवर प्रश्नचिन्ह

by pravin
August 4, 2026
in अन्य खेळ, आंतरराष्ट्रीयस्तरीय, खेळ ( सांघिक ), मल्लखांब, स्पर्धा
0 0
क्रीडामंत्री सुनीत्राताई पवार कारवाई करणार का?
Share on FacebookShare on Twitter

स्पोर्ट्स पॅनोरमा | विशेष प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य हॉर्सी मल्लखांब संघटनेला सन २०१९ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मल्लखांब वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या २५ लाख रुपयांच्या शासकीय अनुदानाच्या वापराबाबत चौकशी समितीने अनेक गंभीर निरीक्षणे नोंदविल्याने हे संपूर्ण प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. चौकशी अहवालात निधी मंजुरी, आर्थिक व्यवहार, निविदा प्रक्रिया, खर्चाची कागदपत्रे आणि प्रशासकीय कार्यपद्धतीबाबत अनेक त्रुटी निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. मात्र, अहवाल शासनाकडे सादर होऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने क्रीडा क्षेत्रातून संताप व्यक्त होत आहे.

चौकशी समितीने काय नोंदविले?

राज्य शासनाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने महाराष्ट्र राज्य हॉर्सी मल्लखांब संघटनेच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन कागदपत्रांची पडताळणी केली. समितीने सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे की, शासनाकडून प्राप्त झालेल्या २५ लाख रुपयांच्या अनुदानाचा खर्च झाल्याचे सांगण्यात आले असले तरी त्या खर्चाशी संबंधित कार्यकारिणीचे ठराव, प्रशासकीय मंजुरी आणि काही आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नव्हती. तसेच विविध साहित्य खरेदी, ध्वनी व्यवस्था, स्टेज, प्रसिद्धी, सुरक्षा, भोजन, डिजिटल सेवा आणि इतर खर्चासाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया किंवा दरपत्रके (कोटेशन) उपलब्ध नसल्याची नोंद करण्यात आली आहे.

‘देणगी’ म्हणून निधी वर्ग केल्याची नोंद

चौकशी अहवालातील क्रमांक ७ मध्ये आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. अहवालानुसार, शासनाकडून मंजूर झालेली २५ लाख रुपयांची अनुदानाची रक्कम श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर (मुंबई) यांच्या बँक खात्यात “देणगी” (Donation) म्हणून वर्ग करण्यात आल्याची नोंद आहे. या व्यवहाराबाबत शासनाकडून मिळालेल्या अनुदानाची रक्कम देणगी म्हणून का वर्ग करण्यात आली, याची नोंद आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्याचे समितीने नमूद केले आहे.

क्रीडा क्षेत्रातील जाणकारांच्या मते, शासकीय अनुदान आणि देणगी या दोन वेगळ्या आर्थिक संकल्पना आहेत. त्यामुळे या व्यवहाराचे स्वरूप आणि त्यामागील प्रशासकीय प्रक्रिया स्पष्ट होणे आवश्यक असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अहवालानंतरही कारवाईचा अभाव

चौकशी समितीने गंभीर प्रक्रियात्मक त्रुटी निदर्शनास आणून दिल्यानंतरही संबंधित संघटना, जबाबदार अधिकारी किंवा अनुदान मंजुरी प्रक्रियेशी संबंधित व्यक्तींवर कोणती प्रशासकीय कारवाई करण्यात आली, निधी वसुलीचा निर्णय झाला का किंवा जबाबदारी निश्चित करण्यात आली का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

त्यामुळे चौकशी समितीचा अहवाल शासनाच्या फाईलमध्येच राहिला का, असा प्रश्न क्रीडा क्षेत्रातून उपस्थित होत आहे.

उपसंचालक उदय के. जोशी यांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही

या संपूर्ण प्रकरणाबाबत क्रीडा संचालनालयाची अधिकृत भूमिका जाणून घेण्यासाठी स्पोर्ट्स पॅनोरमाने क्रीडा संचालनालयाचे उपसंचालक उदय के. जोशी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. चौकशी अहवाल, २५ लाखांच्या अनुदानाचा वापर, निधी वसुली आणि पुढील कारवाईबाबत प्रश्न विचारण्यात आले.

मात्र, त्यांनी “माहिती आणि संबंधित कागदपत्रे समोरासमोर बसून पाहिल्याशिवाय किंवा तपासल्याशिवाय कोणतीही प्रतिक्रिया देता येणार नाही,” असे सांगत स्पष्ट भूमिका मांडण्यास नकार दिला.

सहसंचालक सुधीर मोरे यांचाही पुन्हा प्रतिसाद नाही

या प्रकरणात अधिकृत भूमिका जाणून घेण्यासाठी स्पोर्ट्स पॅनोरमाने क्रीडा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे यांच्याशी यापूर्वीही दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. चौकशी समितीचा अहवाल समोर आल्यानंतर पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला, तरीही त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

विशेष म्हणजे, तक्रारदारांनी यापूर्वीच सहसंचालक सुधीर मोरे यांच्यावर या प्रकरणातील चौकशी आणि पुढील कारवाईसंदर्भात सातत्याने टाळाटाळ केल्याचा आरोप केला आहे. तसेच, संबंधित प्रकरणातील काही व्यक्तींशी त्यांचे निकटचे संबंध असल्याचाही दावा तक्रारदारांनी केला आहे. या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही. मोरे यांची भूमिका जाणून घेण्यासाठी वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद न मिळाल्याने या आरोपांवर त्यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही.

आता चेंडू क्रीडामंत्री सुनीत्राताई पवार यांच्या कोर्टात

चौकशी समितीचा अहवाल शासनाकडे उपलब्ध असताना आणि त्यामध्ये अनेक प्रक्रियात्मक त्रुटींची नोंद असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आता राज्याच्या क्रीडामंत्री सुनीत्राताई पवार यांच्याकडे संपूर्ण क्रीडा क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

क्रीडा क्षेत्रातून आता पुढील प्रश्न उपस्थित केले जात आहेत—

  • चौकशी समितीच्या अहवालावर तातडीने निर्णय घेतला जाणार का?
  • २५ लाखांचे शासकीय अनुदान नियमबाह्य पद्धतीने वितरित झाले असल्यास त्याची वसुली केली जाणार का?
  • अनुदानाची रक्कम “देणगी” म्हणून वर्ग करण्यामागील कारणांची स्वतंत्र चौकशी केली जाणार का?
  • नियमबाह्य पद्धतीने अनुदान मंजूर करणाऱ्या किंवा प्रक्रियेत त्रुटी राहिलेल्या संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर विभागीय किंवा शिस्तभंगाची कारवाई होणार का?
  • चौकशी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी कधी होणार?

राज्यातील खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींचे मत आहे की, चौकशी समितीने गंभीर निरीक्षणे नोंदविल्यानंतरही कारवाई होत नसेल, तर राज्य क्रीडा विकास निधीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.

आता या प्रकरणात क्रीडामंत्री सुनीत्राताई पवार काय निर्णय घेतात, दोषींवर कारवाई होते का आणि चौकशी अहवालातील निरीक्षणांवर शासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण क्रीडा क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Tags: Inquiry ReportMaharashtra Sports NewsMallakhamb NewsMallakhamb World ChampionshipMarathi Breaking NewsSports GrantSports Investigationsports news marathiSports PanoramaSports Scamउदय के जोशीक्रीडा संचालनालयचौकशी अहवालमल्लखांब अनुदान वादमल्लखांब वर्ल्ड कपमहाराष्ट्र राज्य हॉर्सी मल्लखांब संघटनाराज्य क्रीडा विकास निधीसुधीर मोरेसुनीत्राताई पवार₹25 लाख अनुदान

pravin

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात २४ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान राष्ट्रीय अंडर-१४ क्ले कोर्ट टेनिस स्पर्धा. २०० हून अधिक खेळाडूंचा सहभाग; दोन लाखांची शिष्यवृत्ती.
खेळ ( सांघिक )

छत्रपती संभाजीनगरात उद्यापासून राष्ट्रीय ज्युनियर क्ले कोर्ट टेनिसचा थरार!

October 23, 2026
विजयादशमीनिमित्त 'स्पोर्ट्स पॅनोरमा'चा १८ पानी विशेषांक; ५ टक्के क्रीडा आरक्षणासह खेळांवर विशेष भर
ब्लॉग

विजयादशमीनिमित्त ‘स्पोर्ट्स पॅनोरमा’चा १८ पानी विशेषांक; ५ टक्के क्रीडा आरक्षणासह खेळांवर विशेष भर

October 19, 2026
वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या
खेळ ( वैयक्तिक)

वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

October 16, 2026
खेळाडूंसाठी काय केले? आमदार सतीश चव्हाण यांनी कामाचा हिशोब द्यावा
अन्य खेळ

खेळाडूंसाठी काय केले? आमदार सतीश चव्हाण यांनी कामाचा हिशोब द्यावा

October 6, 2026
शासकीय नोकरीत खेळाडूंना ५% आरक्षण; महाराष्ट्र सरकारचा सुधारित निर्णय जारी
खेळ ( वैयक्तिक)

शासकीय नोकरीत खेळाडूंना ५% आरक्षण; महाराष्ट्र सरकारचा सुधारित निर्णय जारी

October 5, 2026
राज्यस्तरीय शालेय वुशू स्पर्धेचे छत्रपती संभाजीनगरात उद्घाटन
खेळ ( वैयक्तिक)

“राज्यस्तरीय शालेय 17 वर्षांतील मुले व मुलींच्या वुशू क्रीडा स्पर्धाचे थाटात उद्घाटन

September 28, 2026
Load More
Next Post
क्रीडा मार्गदर्शक भरती प्रकरण पुन्हा चर्चेत; सहसंचालक सुधीर मोरे यांच्या भूमिकेच्या चौकशीची मागणी

क्रीडा मार्गदर्शक भरती प्रकरण पुन्हा चर्चेत; सहसंचालक सुधीर मोरे यांच्या भूमिकेच्या चौकशीची मागणी

Connect with us

  • 24k Followers
  • Trending
  • Comments
  • Latest
शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

October 23, 2026
वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

October 16, 2026
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १२ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया

October 9, 2026

indian xxx video film telegram ✓ Discover Top Indian Adult Content Channels

February 15, 2025

बाहुबलीची देवसेना क्रिकेटरच्या प्रेमात ;

ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाला शुभेच्छा तर दिल्या मात्र, फरहानने केली ‘ही’ चूक

भारतीय महिला हॉकी संघाचं शाहरुखकडून कौतुक म्हणाला, ‘तुम्ही मन दुखावलं आहे पण…’

एकदा ऑलिम्पिक संपलं तर की मग पून्हा आपण आपल्या विश्वात रमायला मोकळे.

आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

November 2, 2026
ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

November 2, 2026
नव्या सिंथेटिक ट्रॅकवरून देशासाठी पदके जिंकणारे खेळाडू घडतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नव्या सिंथेटिक ट्रॅकवरून देशासाठी पदके जिंकणारे खेळाडू घडतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

November 2, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅकचे १ नोव्हेंबरला लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅकचे १ नोव्हेंबरला लोकार्पण

October 31, 2026

Recommended

About Us

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Read more

Categories

  • Football
  • ॲथलेटिक्स
  • अन्य खेळ
  • आंतरराष्ट्रीयस्तरीय
  • आयपीएल
  • आयपीएल
  • आशियाई क्रीडा स्पर्धा
  • ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स
  • कबड्डी
  • कराटे
  • कुस्ती
  • क्रिकेट
  • खेलो इंडिया
  • खेलो इंडिया बीच स्पर्धा
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेळ ( वैयक्तिक)
  • खेळ ( सांघिक )
  • खेळाडू
  • खो-खो
  • जलतरण
  • जिम्नॅस्टिक
  • जिल्हा
  • जिल्हास्तरीय
  • ज्युडो
  • टी-20 वर्ल्ड कप
  • टेबल टेनिस
  • तलवारबाजी
  • तायक्वांदो
  • तालुकास्तरीय
  • धनुर्विद्या
  • नॅशनल गेम्स
  • नेमबाजी
  • नोकरी भरती
  • पुरस्कार
  • प्रो कबड्डी
  • फिफा वर्ल्ड कप
  • बातम्या
  • बुद्धिबळ
  • बॅडमिंटन
  • बॅडमिंटन
  • बेसबॉल
  • बॉक्सिंग
  • ब्लॉग
  • मल्लखांब
  • महाराष्ट्र केसरी कुस्ती
  • महिला महाराष्ट्र केसरी
  • युनिव्हर्सिटी गेम्स
  • योगा
  • योजना
  • रणजी करंडक
  • राज्य
  • राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां
  • राज्यस्तरीय
  • राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक
  • राष्ट्रकुल स्पर्धा
  • राष्ट्रीय
  • राष्ट्रीयस्तरीय
  • रोईंग
  • लाईव्ह
  • लॉंग टेनिस
  • विभागीयस्तरीय
  • वुशू
  • वेटलिफ्टिंग
  • व्हॉलीबॉल
  • सॉफ्टबॉल
  • स्क्वॉश
  • स्पर्धा
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
  • स्पोर्ट्स पॅनोरमा विशेषांक
  • हँडबॉल
  • हॉकी

Tags

36th National Games 36th National Sports Tournament News 37th National Games Goa 37th National Games Goa news bbci BCCI Chhatrapati Sambhajinagar Commonwealth Games 2026 COMPATATION Cricket Cricket News CWG 2026 Football Glasgow 2026 Hockey india Indian ipl ipl 2022 IPL Indian premier league IPL Indian premier league 2021 cricket BCCI khelo india youth games 2021 khelo india youth games 2021 Marathi News Latest sports news latest sports news marathi live maharashtra Maharashtra Sports News Marathi sports news match NEWS Play Pro Kabaddi result schulde Sports News SPORTS NEWS latest Sports news live sports news marathi Sports Panorama team india TENNIS Virat Kohli win छत्रपती संभाजीनगर

Recent News

आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

November 2, 2026
ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

November 2, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In