औरंगाबाद(प्रतिनिधी)-भारतीय बास्केटबॉल महासंघ-नियुक्त-ऍडव्होक समिती महाराष्ट्र व क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन, यांच्यावतीने, चौथ्या खेलो इंडिया निवड चाचणी साठी जुनिअर बास्केटबॉल मुलींची निवड, राज्य जुनिअर बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धा, व पुरुष व महिला गटांचा राज्याच्या संघाची निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन, दिनांक १२ ते १६ डिसेंबर २०२१ तारखेदरम्यान औरंगाबाद, येथे करण्यात आले आहे. काल दिनांक 12 डिसेंबर रोजी सायंकाळी स्पर्धेचे मोठया थाटात उदघाटन करण्यात आले.
या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार अंबादासजी दानवे, विधानपरिषद, यांची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर उर्मिला मोराळे, उप-संचालक औरंगाबाद विभाग, डॉ. धनंजय वेळूकर, स्पर्धा संयोजन समिती अध्यक्ष शत्रुघ्न गोखले, संयोजन समिती सचिव, जयंत देशमुख, संयोजन समिती सदस्य, शशिकांत नांदगावकर, संयोजन समिती सदस्य, डॉ शरद बनसोडे, तांत्रिक समिती प्रमुख, लोकल असिस्टंट गणेश कड, सह-सचिव सचिन तत्तापुरे, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राचार्या शशिकला निळवंत आणि पूजा दुतोंडे यांनी केले.