औरंगाबाद(प्रतिनिधी)-डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने उस्मानाबाद परंडा येथे आयोजित आंतर महाविद्यालय बॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धेमध्ये टाकस् बॉक्सिंग अकॅडमीच्या ६ खेळाडूची निवड झाली असून जलनडर येथे होणार्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये हे खेळाडू सहभागी होतील.
निवड झालेले खेळाडू संध्या विश्वकर्मा, कृष्णा राऊत, प्रथमेश बेराड, अर्जुन तोमर, ईशांत लाहोट, रोहन टाक यांना टाकस् बॉक्सिंग अकॅडमीचे एन.आय.एस. कोच राहुल टाक यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी खेळाडूंना संघटनेचे अध्यक्ष मा.आ.श्रीकांत जोशी, क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे, उपाध्यक्ष डॉ.केजल भट, सचिव पंकज भारसाखळे यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.