मुंबई: आयपीएलच्या १५ व्या मोसमातील डबल हेडर मधला दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. ज्यात नाणेफेक जिंकून पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अग्रवालने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या आरसीबीच्या संघाने धावांचा पाऊस पडला आहे. आजी आणि माजी कर्णधार फाफ आणि कोहलीने मिळून १०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. तसेच १५व्या हंगामातील पहिला २०० स्कोर आरसीबीकडून आला. मात्र त्यांच्या या बलाढ्य धावांच्या डोंगराला पंजाबने सर करत ५ विकेट्सने विजय नोंदवला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच आरसीबीच्या (RCB) फलंदाजांनी आक्रमक कामगिरी केली. ज्यात कर्णधार फाफने (Faf du plessis) कॅप्टन्स इनींग्ज करत शानदार अर्धशतक ठोकले. फाफने ५७ चेंडूत ८८ धावा केल्या ज्यात ३ चौकर आणि ७ षटकारांचा समावेश होता. तसेच तो बॅड झाल्यानंतर कोहली आणि कार्तिकने फटकेबाजी सुरु ठेवत आरसीबीला २०५ धावांपर्यंत पोहचवले. पंजाबकडून या धावांच्या डोंगराला सर करण्यासाठी सलामीवीर मयंक आणि शिखर धवनने चांगली सुरुवात केली. तसेच तिसऱ्या क्रमांकांवर उतरलेल्या राजपकसानेही ४३ धावांची महत्वपूर्ण खेळी केली.
Power hitting at its finest by @PunjabKingsIPL 🔥🔥🔥
Live – https://t.co/LiRFG8lgc7 #TATAIPL #PBKSvRCB pic.twitter.com/lHh7Le7yYY
— IndianPremierLeague (@IPL) March 27, 2022
एकावेळी अटीतटीचा वाटणाऱ्या या सामन्यात बँगलोर कडून मोहम्मद सिराजने सलग २ विकेट्स घेतल्या. ज्यात अंडर १९ चा स्टार राज बावा जो पहिलाच आयपीएल सामना खेळत होता तो डकवर माघारी परतला. यंत्र फलंदाजीला उतरलेल्या शाहरुख खान आणि ओडीन स्मिथने पंजाबला विजयाच्या जवळ नेले. दोघांनीही धुव्वादार फलंदाजी करत १९ व्या षटकातच २०६ धावा पूर्ण करत विजय मिळवला. पंजाबने आरसीबीला धूर चारत स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे.