पुणे(प्रतिनिधी) एम टेनिस अकादमी यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीए-नवसह्याद्री क्रीडा संकुल अखिल भारतीय टॅलेंट सिरीज 12वर्षाखालील (7दिवसीय) टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात प्रजीतरेड्डी मदीरेड्डी, अझलान शेख, वेदांत जोशी, अंशुल पुजारी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.
नवसह्याद्री क्रीडा संकुल येथील टेनिस कोर्टवर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात प्रजीतरेड्डी मदीरेड्डी याने पार्थ दाभीकरचा 9-7 असा तर, अझलान शेख याने रुद्र मेमानेचा 9-7 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. अंशुल पुजारीने आरव गर्गचा 9-0 असा एकतर्फी पराभव केला. अवधूत निलाखे याने विहान पंडितचा 9-4 असा तर, वेदांत जोशीने विवान मल्होत्राचा 9-1 असा पराभव करून दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश केला.
याशिवाय स्पर्धेत देशभरांतून मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, गुजरात, बुलढाणा, कर्नाटक या ठिकाणांहुन एकूण 80 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक, प्रशस्तीपत्रक व गुण अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी रिया चाफेकर यांची एमएसएलटीए सुपरवायझर म्हणून निवड करण्यात आली असल्याची माहिती स्पर्धेचे संचालक केतन धुमाळ यांनी दिली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 12 वर्षांखालील मुले: पहिली पात्रता फेरी:
विहान कांगतानी वि.वि.अनिरुद्ध अनंतरमण 9-2;
अवधूत निलाखे वि.वि.विहान पंडित 9-4;
वेदांत जोशी वि.वि.विवान मल्होत्रा 9-1;
अनिश वडनेरकर वि.वि.इशीन भट 9-0;
प्रजीतरेड्डी मदीरेड्डी वि.वि.पार्थ दाभीकर 9-7;
अझलान शेख वि.वि.रुद्र मेमाने 9-7;
अंशुल पुजारी वि.वि.आरव गर्ग 9-0;
क्रिशीव मागो वि.वि. स्वस्तिक मिश्रा 9-3.