इंडियन प्रमीयर लीग २०२२ हंगामाला सुरुवात झाली आहे. पण, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा दिग्गज अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल या हंगामातील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. पण यामागे नक्की काय कारण आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. मॅक्सवेल त्याची प्रेयसी विनी रमणबरोबर लग्नबंधनात अडकला आहे. विनी भारतीय वंशाची आहे. त्यामुळे मॅक्सवेल आणि विनीचे रविवारी (२७ मार्च) भारतीय पद्धतीने लग्न झाले. त्यांच्या लग्नातील एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
विनी ही मुळची तमिळनाडूमधील असल्याने मॅक्सवेलसह तिचे लग्न तमिळ पद्धतीने झाले. त्यांच्या या लग्नातील व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मॅक्सवेल आणि विनी भारतीय वेशात दिसत आहेत. तसेच त्यांच्या लग्नातील वरमाळा घालण्याचा विधी सुरू असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच मॅक्सवेल यावेळी ठेका धरतानाही दिसून येत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनाही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Maxi becomes a Chennai Maaplai! Thirumana Vaazhthukkal! Whistles to more maximums in your new partnership!💛#WhistlePodu #Yellove pic.twitter.com/cKfPkkON9S
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 28, 2022
तसेच काही दिवसांपूर्वीच विनी हिने त्यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली असल्याचे सोशल मीडियावरून माहिती दिली होती. तिने त्यांच्या हळदीचे फोटो शेअर केले होते.तसेच चेन्नई सुपर किंग्स संघाच्या सोशल मीडिया अकाउंटवरूनही विनी आणि मॅक्सवेल यांना लग्नाच्या शुभेच्छा सोमवारी (२८ मार्च) देण्यात आल्या आहेत.
Glenn Maxwell Malai Mattral 🤣 pic.twitter.com/Nu3ikToVRi
— Tinku | ಟಿಂಕು (Modi Ka Parivar) (@tweets_tinku) March 27, 2022
दहादिवसांपूर्वी झाले ख्रिस्ती पद्धतीने लग्न
विनी आणि मॅक्सवेल यांचे भारतीय पद्धतीने लग्न होण्याच्या १० दिवसांपूर्वी म्हणजेच १८ मार्च रोजी ख्रिस्ती पद्धतीने लग्न झाले आहे. याबद्दल विनीने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली होती. तिने शेअर केलेल्या फोटोला ‘मिस्टर अँड मिसेस मॅक्सवेल. १८.०३.२२’ असे कॅप्शन दिले आहे.
मॅक्सवेल आणि विनीची तमिळ लग्नपत्रिका झालेली व्हायरल
विनी आणि मॅक्सवेल यांच्या लग्नाच्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाची तमिळ लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ही लग्नपत्रिका तमिळ भाषेत छापलेली दिसत होती. असे असले तरी त्यांच्या लग्नाची तारिख आणि ठिकाण इंग्लिशमध्ये छापण्यात आले होते. त्यामुळे या पत्रिकेनुसार मॅक्सवेल २७ मार्च रोजी मेलबर्नमध्ये लग्न करणार असल्याचे स्पष्ट होत होते.
GlennMaxwell marrying Vini Raman. Going by the cute traditional Tamil muhurta patrikai, we'd bet there may likely be a TamBram ceremony… Will there be a white gown wedding too?
Congratulations Glenn and Vini ! @Gmaxi_32 pic.twitter.com/uJeSjHM1we— Kasturi (@KasthuriShankar) February 12, 2022
दोन वर्षांपूर्वी केलेला साखरपूडा
मॅक्सवेल आणि विनी यांनी २०२० साली भारतीय पद्धतीने साखरपुडा केला होता. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो देखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता साखरपुड्याच्या २ वर्षांनंतर दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत.
विनी आणि ग्लेन मॅक्सवेल हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. विनी हिने मेडिकल सायन्सची पदवी घेतली आहे. तसेच मेलबर्नमध्येच फार्मासिस्ट म्हणून काम करत आहे. विनी भारतीय वंशाची असली, तरी ती ऑस्ट्रेलियामध्ये कुटुंबासह स्थायिक झालेली आहे. पण असे असले तरी अनेकदा ती भारतात येत असते.