‘कॅच विन्स द मॅच’ क्रिकेटमध्ये ही संज्ञा वारंवार ऐकायला मिळते. एक अचूक टिपलेला झेल किंवा हातून सुटलेला झेल सामन्याची रुपरेषा बदलू शकतो. युवा भारतीय क्रिकेटपटू शुबमन गिल याने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या आयपीएल २०२२ मधील चौथ्या सामन्यात याचा प्रत्यय दिला आहे. गुजरात जायंट्सचे प्रतिनिधित्त्व करताना शुबमनने पावरप्लेमध्ये लखनऊच्या फलंदाजाचा जबरदस्त झेल टिपला आहे.
https://twitter.com/Cute_Ladka21/status/1508450618746470400?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1508450618746470400%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtradesha.com%2Fipl-2022-gt-vs-lsg-shubman-gill-take-unbelievable-running-catch-to-dismiss-evin-lewis%2F
वेगवान गोलंदाज वरूण आरोन सामन्याचे चौथे षटक टाकत होता, यावेळी तिसऱ्या चेंडूवर लखनऊच्या एविन लुईसने हवेत फटका खेळला. शुबमनने मिड विकेटला पाठी धावत जात आणि हवेत सूर मारत अप्रतिम झेल टिपला.त्याच्या प्रयत्नांमुळे लुईस केवळ १० धावांवर पव्हेलियनला परतला. दुसरीकडे शुबमनच्या या जबरदस्त झेलने सर्वांना महान भारतीय कर्णधार कपिल देव यांच्या १९८३ विश्वचषकातील अविस्मरणीय झेलची आठवण करून दिली, जो त्यांनी अंतिम सामन्यात घेतला होता.
Is it a 🪁? Is it a ✈️? No! It's Shubman Gill!#TitansFAM, 𝙩𝙖𝙢𝙚 𝙟𝙤𝙮𝙪 𝙠𝙚?#SeasonOfFirsts #AavaDe #GTvLSG #TATAIPL pic.twitter.com/BoAePJxqJL
— Gujarat Titans (@gujarat_titans) March 28, 2022