पुणे : डबल महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर हर्षवर्धन सदगीरनं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्याच्या हस्ते बप्पाची आरती करत ट्रस्टतर्फे विश्वस्त महेश सुर्यवंशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पुण्यातील वाघोली मधील आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडवर मात करून पराभूत करत 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकली आहे. हर्षवर्धन सदगीर हा डबल महाराष्ट्र केसरी झाला असून यानंतर त्यानं त्याच्या मनातील खंत व्यक्त करत मला नोकरी नको अस म्हटलं होतं. पण आता जर सरकारनं मला नोकरी दिली तर मी करणार असल्याचं यावेळी त्यानं सांगितलं. ‘
68व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी हर्षवर्धन सदगीरनं यावेळी सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की, “माझं स्वप्न होतं की मला एकदा करुन दाखवायचं होतं ते मी काल करुन दाखवलं आहे. मी गरीब घरचा महाराष्ट्र केसरी होतो, नोकरीसाठी सर्वत्र फिरलो. तब्बल दोन वर्ष मी नोकरीसाठी फिरत होतो पण सरकारनं मला नोकरी दिली नाही. मी तत्कालीन मुख्यमंत्री, मंत्री दादा भुसे यांना देखील भेटलो पण मला प्रतिसाद दिला नाही, म्हणून मी माझ्या मनातील खंत बोलून दाखवली. आता जर मला नोकरी दिली तर मी नक्कीच करणार असल्याचं यावेळी त्यानं सांगितल.” तसंच मॅटची कुस्ती सोडल्याबाबत हर्षवर्धन म्हणाला की, मी जो दोन वर्ष संघर्ष केला आहे त्याबाबत काल मी ते बोललो होतो आता माझ्या कुस्तीबाबत माझे वस्ताद काका पवार जे काही निर्णय घेतील ते मला मान्य असणार असल्याचं यावेळी हर्षवर्धननं सांगितलं.





