• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राज्यस्तरीय जुनियर अजिंक्यपद स्पर्धेत अझमीर आणि हर्षिता यांना दुहेरी मुकुट

by pravin
April 12, 2022
in राज्यस्तरीय, लॉंग टेनिस
राज्य जुनियर अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईच्या अझमीर शेख आणि हर्षिता बांगेरा यांना दुहेरी मुकुट
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

नाशिक। नाशिक जिल्हा लॉन टेनिस संघटना(एनडीटीए) यांच्या तर्फे व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या आठव्या महाराष्ट्र राज्य 17 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात मुंबईच्या अझमीर शेख याने तर, मुलींच्या गटात हर्षिता बांगेरा यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.

एनआयडब्लूइसी टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेतएकेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात दुसऱ्या मानांकित मुंबईच्या अझमीर शेख याने येवल्याच्या सहाव्या मानांकित लक्ष्य गुजराथीचा 2-6, 6-3, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. दुहेरीत अंतिम लढतीत मुंबईच्या अझमीर शेखने पुण्याच्या साहिल तांबटच्या साथीत लक्ष्य गुजराथी व अनुष गनबहादूर यांचा 6-0, 6-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

मुलींच्या गटात अंतिम फेरीत मुंबईच्या अव्वल मानांकित हर्षिता बांगेरा हिने पुण्याच्या पाचव्या मानांकित रिया भोसलेचा 6-1, 6-2 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. दुहेरीत मुंबईच्या डेनिका फर्नांडो व हर्षिता बांगेरा या जोडीने पुण्याच्या रिया भोसले व रमा शहापूरकर सुपरटायब्रेकमध्ये 6-7(3), 6-0, 10-7 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देशपांडे, एनआयडब्लूइसी क्लबच्या टेनिस विभागाचे अध्यक्ष श्रीकांत कुमावत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएच्या सुपरवायझर तेजल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:
उपांत्य फेरी:17 वर्षांखालील मुले:
लक्ष्य गुजराथी(येवला)[6] वि.वि.साहिल तांबट(पुणे) [1] 5-4(5), 1-4, 4-0;
अझमीर शेख(मुंबई)[2] वि.वि.तेजल पाल(नागपूर) 4-1, 4-0;
अंतिम फेरी: अझमीर शेख(मुंबई)[2] वि.वि.लक्ष्य गुजराथी(येवला)[6]2-6, 6-3, 6-4;

17वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
हर्षिता बांगेरा(मुंबई)[1]वि.वि.रमा शहापूरकर(पुणे)[6] 4-0, 4-0;
रिया भोसले(पुणे)[5]वि.वि.डेनिका फर्नांडो(मुंबई)4-1, 4-0;
अंतिम फेरी:हर्षिता बांगेरा(मुंबई)[1]वि.वि.रिया भोसले(पुणे)[5]6-1, 6-2;

दुहेरी: उपांत्य फेरी: मुले:
अझमीर शेख(मुंबई)/साहिल तांबट(पुणे)वि.वि.कशित नागराळे(नागपूर)/तेजल पाल(नागपूर)4-0, 4-0;
लक्ष्य गुजराथी(येवला)/अनुष गनबहादूर(नाशिक)वि.वि.रोहित पुट्टा(सोलापूर)/प्रसन्ना पांडेकर(सोलापूर)[2] 4-1, 5-4(7);
अंतिम फेरी: अझमीर शेख(मुंबई)/साहिल तांबट(पुणे)वि.वि.लक्ष्य गुजराथी(येवला)/अनुष गनबहादूर(नाशिक) 6-0, 6-0;

मुली:
डेनिका फर्नांडो(मुंबई)/हर्षिता बांगेरा(मुंबई)[1] वि.वि.रिधिमा शॉ(नागपूर)/ओमश्री प्रसाद(नागपूर)4-1, 4-2;
रिया भोसले(पुणे)/रमा शहापूरकर(पुणे)वि.वि.समृद्धी भोसले(नांदेड)/वेदिका माळी(सातारा)[2] 4-1, 4-2;
अंतिम फेरी: डेनिका फर्नांडो(मुंबई)/हर्षिता बांगेरा(मुंबई)[1] वि.वि.रिया भोसले(पुणे)/रमा शहापूरकर(पुणे)-7(3), 6-0, 10-7

Tags: Maharashtra State Lawn Tennis AssociationMumbai's Azmir Sheikh and Harshita Bangera win double crown in State Junior ChampionshipsNashik District Lawn Tennis Association
ShareTweetSend
Next Post
प्रफुल्ल पटेलला आता एआयएफएफमध्ये स्थान नाही: क्रीडा मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले

प्रफुल्ल पटेलला आता एआयएफएफमध्ये स्थान नाही: क्रीडा मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.