छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
नेपाळची राजधानी काठमांडू येथे होणाऱ्या आशियाई ३-अ-साईड व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर येथील श्री गजानन विद्या मंदिर आणि बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूलच्या नऊ खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामध्ये सहा मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे.
मुलांमध्ये अदनान शेख, यश खंबाट, रेहान शेख, अनमोल सिंग, अथर्व पगारे आणि ऋषिकेश शिंदे यांना भारतीय संघात स्थान मिळाले आहे. मुलींमध्ये दिव्या पढार, अक्षरा मखरे आणि अक्षरा खोमणे यांची निवड झाली आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आय. जी. जाधव, सचिव हरीश जाधव, व्हॉलीबॉल प्रशिक्षक जब्बार पठाण आणि सर्व शिक्षकवृंद यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.














