बुधवारी जाहीर झालेल्या Icc men’s players Ranking भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यर यांनी गरुड झेप घेतली आहे.विंडीजविरुद्धच्या मालिकेत सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावा केल्या आहेत,आणि व्यंकटेश अय्यरने देखील चांगली कामगिरी केली आहे.भारताचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यर या जोडीने आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
भारताने नुकतीच संपलेली तीन सामन्यांची टी-२० मालिका ३-०ने जिंकली होती. भारताकडून या मालिकेत सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावा केल्या तर अय्यर दुसऱ्या स्थानावर राहिला आहे.
सूर्यकुमार यादवने आयसीसी टी-२० क्रमवारीत ३५ तर युवा फलंदाज व्यंकटेश अय्यरने २०३ गुणांची मोठी झेप घेतली आहे. सूर्यकुमार आता २१व्या तर व्यंकटेश ११५व्या क्रमांकावर पोहोचला आहे. वेस्ट इंडीजच्या निकोलस पूरननेही पाच स्थानांचा फायदा घेतला असून तो १३व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
भारताने ४ षटकात ३ विकेट गमावल्या असताना यादव फलंदाजीला आला. त्यानंतर भारतीय संघाला ४५ चेंडूत ६५ धावा हव्या होत्या. यादव आणि अय्यर यांनी भागीदारी रचून संघाला ७ चेंडू राखून विजय मिळवून दिला. सूर्याने १८ चेंडूत ३४ तर व्यंकटेशने १३ चेंडूत २४ धावा केल्या आणि दोघेही नाबाद परतले. विंडीजविरुद्धच्या अंतिम टी-२० सामन्यातही या जोडीने भारताला संकटातून बाहेर काढले आणि विजय मिळवला. त्या सामन्यात सूर्यकुमार यादवने ३१ चेंडूत ६५ धावा केल्या तर व्यंकटेश अय्यर १९ चेंडूत ३५ धावा करून नाबाद राहिला. सूर्याला मालिकावीर म्हणूनही गौरविण्यात आले.