मुंबई समोर राजस्थानचे आवाहन होते या सामन्यांमध्ये गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या बळावर मुंबईने राजस्थानचा आठ गडी व तब्बल 70 चेंडू राखून दणदणीत विजय मिळविला आहे. इतके चेंडू राखून विजय मिळविणारी मुंबई आयपीएल मध्ये पहिली टीम ठरली.या विजयामुळे मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याच्या आशा कायम आहे.
आता मुंबई ला पुढचा सामना जिंकून कोलकाताच्या सामन्याच्या निकालावर त्यांचे प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याचे भवितव्य ठरणार आहे. उद्या बेंगलोर समोर हैदराबादचे आवाहन असणार आहे बेंगलोर प्ले ऑफ मध्ये पोहोचली आहे तर दुसरीकडे हैदराबाद मात्र प्ले ऑफ च्या बाहेर गेली आहे.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवीत कर्णधाराला निराश नाही केले. राजस्थानचे फलंदाज सुरुवातीपासूनच ‘तू चल मै आया’या अवस्थेप्रमाणे एकापाठोपाठ तंबूत परतत होते. राजस्थानचे तब्बल सात फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले नाही.
राजस्थान चा डाव फक्त 89 धावात गडगडला.लेवीज ने सर्वाधिक फक्त 24 धावा केल्या. तर मुंबईकडून गोलंदाजीमध्ये कोल्टर नाईल ने चार तर निषमणे तीन गडी बाद केले.धावांचा पाठलाग करीत असताना मुंबईच्या सलामीवीरांनी संघाला जोरदार सलामी करून दिली. 22 धावा करून रोहित शर्मा बाद झाला. तर सूर्यकुमार यादवने तेरा धावा केल्या. ईशान किशन ने सर्वाधिक फक्त पंचवीस चेंडूत सर्वाधिक 50 धावा केल्या. तर राजस्थान कडून साकरीया व मुस्तफिजुर ने प्रत्येकी एक गडी बाद केला.