पी के एल 8: कबड्डी,कबड्डी,कबड्डी! प्रो कबड्डीच्या तारखा जाहीर ‘या’या दिवशी सुरू होणार स्पर्धेला सुरुवात.

भारताचा हक्काचा खेळ असणाऱ्या कबड्डीचे पुन्हा सर्वांना वेड लावले ते प्रो कबड्डी लीग ने. मातीतला हा रांगडा खेळ मॅटवर खेळला जाऊ लागला असला तरी त्याची चुरस आणि मजा मात्र कमी झालेली नाही. दरम्यान याच प्रो कबड्डी लीग च्या आठव्या पर्वाला दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सर्वात होणार आहे. 22 डिसेंबर पासून बंगळूर येथे या खेळांच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे.
दरम्यान कोरोणाच्या संकट अजूनही असल्याने प्रेक्षकांना मात्र प्रत्यक्षात सामना पाहता येणार नाही. त्यामुळे या सामन्याची मजा टेलिव्हिजनवर घ्यावी लागेल.पी के एल चे आयोजक मशाल स्पोर्ट ने दिलेल्या माहिती नुसार खेळाडूंच्या प्रकृतीच्या काळजीसाठी प्रेक्षकांना परवानगी दिली नसल्याचे सांगितले आहे. 2019 नंतर कोरोणाच्या संकटामुळे लीग होत नव्हती. 2021 च्या सुरुवातीला सामने होणार होते पण पुन्हा कोरोनाच्या संकटामुळे ही स्पर्धा कॅन्सल करण्यात आली होती. पण आता सुरक्षेची सर्व काळजी घेऊन ही स्पर्धा सुरू होणार आहे.
Comments are closed.