भारताची 14 वर्षे नेमबाज नामया कपूरने नवा इतिहास रचला आहे. आयएसएस एफजूनियर वर्ल्ड चंपियनशिप स्पर्धेतील 25 मीटर पिस्टल प्रकारात तिने सुवर्णवेध साधला.याच इव्हेंटमध्ये मनु भाकेरला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. नामयाने फायनल मध्ये छत्तीस गुण मिळवत फ्रान्सच्या जेदरेज्यूसकी 33 गुण हीला मागे टाकले. अंतिम फेरीत आठ स्पर्धकांमध्ये मनू भाकेरसह अनुभवी नेमबाजांना मागे टाकत नामयाने आपल्यातील क्षमता दाखवून दिली.
भारताची 19 वर्षीय ओलंपियन मनू भाकेरणे एकतीस गुणांसह कांस्यपदक पटकावले. भाकेरणे या कांस्यपदक का शिवाय तीन सुवर्ण पदकेही पटकावली आहे. भारताची रिदम सांगवान 25 मीटर पिस्टल क्रीडाप्रकारात चौथ्या स्थानावर राहिली.भारताने या स्पर्धेत आतापर्यंत सात सुवर्ण,,सहा रोप्य आणि तीन कांस्य पदकासह एकूण सोळा पदकांची कमाई केली आहे. ऑलिंपिक नंतर ही मोठी स्पर्धा आहे.या स्पर्धेत 32 देशातील जवळपास 370 नेमबाजांनी भाग घेतला आहे.