छत्रपती संभाजीनगर | स्पोर्ट्स पॅनोरमा
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे १४ वर्षांखालील मुलांच्या जिल्हा क्रिकेट संघ निवडीसाठी निवड चाचणी सामने आयोजित करण्यात आले आहेत. प्राथमिक निवड चाचणीतून निवडण्यात आलेल्या खेळाडूंची चार संघांत विभागणी करण्यात आली असून, टीम ‘ए’, ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ या संघांची घोषणा करण्यात आली आहे. या निवड चाचणी सामन्यांतील कामगिरीच्या आधारे पुढील निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे मानद सचिव शिरीष बोराळकर यांनी दिली.
निवड प्रक्रियेसाठी १ सप्टेंबर २०१२ नंतर जन्मलेल्या खेळाडूंचा विचार करण्यात आला आहे. निवड झालेल्या खेळाडूंना चार संघांमध्ये विभागण्यात आले असून त्यांच्यात सराव तथा निवड चाचणी सामने खेळविण्यात येणार आहेत.
एडीसीए मैदानावर सकाळी ८ वाजता सामने
एन-२ सिडको येथील औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या (एडीसीए) मैदानावर सकाळी ८ वाजता सामने सुरू होतील. शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी टीम ‘ए’ विरुद्ध टीम ‘बी’, तर शनिवार, १२ सप्टेंबर रोजी टीम ‘सी’ विरुद्ध टीम ‘डी’ असा सामना खेळविण्यात येणार आहे. हे सामने एकदिवसीय स्वरूपात आणि पांढऱ्या गणवेशात खेळवले जाणार आहेत.
चारही संघांची घोषणा
टीम ‘ए’ : तन्मय औराडे (कर्णधार), अर्जुन शेळके, श्लोक राठोड, साई गुंड, दर्शिल लोखंडे, आदित्य सरोदे, आशिष चौधरी, दिपेश बोर्डे, श्रीरंग कुलकर्णी, आर्यन शिंदे, जीशान शेख, तथागत पांडे, अथर्व मोकाशी, वेद महाजन, देवेन पटेल, शौर्य भंडारे, वरुण वर्मा, शिवराज पवार, तन्मय लेकुरवाळे.
प्रशिक्षक : अनंत नेरळकर
टीम ‘बी’ : आदर्श घोलप, प्रज्वल मगरे, अभिमन्यू चव्हाण, आरव पवार, आरव बोर्डे, प्रणव जाधव, राजस जोशी, पियुष चव्हाण, सोहम पिंपळे, सूर्यांश यादव, हर्षल बोरुडे, विराट मदान, अर्चित पांडे, आदर्श गोरे, मानव जमधाडे, अथर्व जाधव, आशिष सूर्यवंशी, अथर्व सोनवणे, अर्जुन वडगावकर.
प्रशिक्षक : कर्मवीर लव्हेरा
टीम ‘सी’ : रितेश घाडगे (कर्णधार), हर्षद कावडे, केतन पारखे, सिद्धांत लाहोटी, अद्वैत दुधे, मोहम्मद पठाण, राजेश कारवाडे, आरव कोल्हे, सुयोग घणवट, हमीद जावेद, श्रेयश राठोड, आहान मुथा, सर्वेश पवार, प्रणव मुरकुले, वंदन पटेल, श्लोक सोनी, अंश यादव, अर्शद शेख, रुद्र मगर.
प्रशिक्षक : प्रज्वल घोडके
टीम ‘डी’ : यशराज उगले, प्रेम व्यवहारे, श्लोक मोरे, विक्रांत भोसले, ब्लेस खेत्रे, शेखर कदम, हुजैफ खान, मोहम्मद अली, उद्धव चव्हाण, युवराज रेड्डी, अब्दुल गनी, समर्थ खोसे, कृतज्ञ जाधव, आयुष बेदमुथा, सुरज वाघ, आयुष अवस्थी, राज जगताप, हर्षवर्धन जाधव, स्वराज घोडीले.
प्रशिक्षक : महेंद्रसिंग कान्सा
कामगिरीकडे निवड समितीचे लक्ष
या सामन्यांमध्ये खेळाडूंना फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण तसेच सामन्यातील एकूण कामगिरी दाखविण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी हे सामने महत्त्वाचे ठरणार आहेत.
सर्व निवड झालेल्या खेळाडूंनी पांढऱ्या गणवेशात स्वतःचे क्रिकेट किट, टिफिन आणि पाण्याची बाटली घेऊन निर्धारित वेळेत मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे मानद सचिव शिरीष बोराळकर यांनी केले आहे.




