औरंगाबाद (प्रतिनिधी) : जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी औरंगाबाद मनपा शाळांच्या क्रीडा साहित्याच्या प्रस्तावामध्ये फेरफार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंबंधीच्या तपासात शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत पाठवण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये क्रीडा साहित्याच्या मूळ यादीवर बनावट यादी चिटकावण्यात आली असल्याचे आढळून आले. या प्रस्तावामध्ये मनपा हद्दीमधील मंजूर करण्यात आलेल्या ४३ शाळा आहेत. त्यापैकी अस्तित्वातच नसलेल्या 7 शाळांना हे क्रीडा साहित्य मंजूर केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या घोटाळ्यात सर्व प्रथम मनपा शाळेची यादी तयार करण्यात आली, त्या यादीवर प्रस्ताव न घेता मंजुरी करून घेण्यात आली. नंतर महानगरपालिका शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत प्रस्ताव मागवण्यात आले. त्यामध्ये मनपा शाळेकडून मागवण्यात आलेल्या क्रीडा सहित्याची यादी न देता जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांच्या सोयीनुसार क्रीडा साहित्याची यादी चिटकावण्यात आली. उदा. चौथीपर्यंत प्राथमिक शाळांना पुरेपूर जागा नसताना क्रिकेटच्या साहित्यामध्ये क्रिकेट मॅट, कबड्डी मॅट असे साहित्य मंजूर करण्यात आले.
या विषयी महानगरपालिका उपायुक्त सौरभ जोशी यांना याविषयी महापालिकेतर्फे कोणती कारवाई करण्यात येणार आहे असे विचारणा केली असता ते म्हणाले याविषयी कारवाई क्रीडा व युवक संचालनालय पुणे, महाराष्ट्र राज्य यांच्यात मार्फत आलेल्या कमिटी मार्फत करण्यात येणार आहे आम्ही कोणतीही कारवाई करू शकत नाही. असे टोलवाटोलवीची उत्तर देण्यात आले
कविता नावंदेंचा चौकशीनंतर कागदपत्रे सावरासावर करण्याचा प्रयत्न झाला का ?
क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांची औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी या कार्यालयात चौकशी समितीचे कामकाज झाल्यानंतर आज दि .९ जानेवारी रोजी (रविवार)शासकीय सुट्टी असतांना क्रीडा अधिकारी कार्यालयातील पी .एस .चव्हाण या कार्यालयात कागदपत्रे पाहणी करण्या करिता आले होते .असे समजताच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय विभागीय क्रीडा सकुल,गारखेडा परिसर येथे स्पोर्ट्स पॅनोरमा दाखल झाले.
यानंतर उपसंचालक मोराळे तात्काळ पोहचण्यापूर्वी पी.एस .चव्हाण याठिकाणी दाखल झाले होते .त्यानंतर काहीक्षणातच उपसंचालक मोराळे याठिकाणी दाखल होऊन कार्यालयाची पाहणी केली .काहीक्षणातच जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेंची एन्ट्री झाली ,पत्रकार याठिकाणी दाखल असलेले बघून त्या संतापून बोलल्या, “पत्रकार माझे म्हणणे न ऐकता माझ्या विरोधात बातम्या टाकत आहेत तसेच माजी क्रीडा अधिकारी राजाराम दिंडे यांचा फोटो काढून स्पोर्ट्स पॅनोरमा वर दाखवण्यात आला तसेच याप्रसंगी गोकुळ तांदळे याठिकाणी उपस्थित असतांनाही त्यांचे नाव का घेण्यात आले नाही”या विषय वारंवार पत्रकारांनी बाजू मांडून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही असे त्यांना सांगितले . त्यानुसार त्यांची बाजू ऐकून
याविषयी उपसंचालक मोराळे यांना स्पोर्ट्स पॅनोरमा ने नावंदेंच्या समोरच विचारणा केली कि , राजाराम दिंडे हे कोणत्या साली सेवानिवृत्त झाले व तुम्ही त्यांना याठिकाणी बोलावले आहे का? तर उपसंचालक म्हणाल्या मे २०१९ मध्ये दिंडे हे सेवानिवृत्त झालेले आहेत आणि मी त्यांना याठिकाणी चौकशी दरम्यान बोलावले नाही . त्यानंतर चौकशी अधिकारी या नात्याने तुम्ही तांदळे यांना याठिकाणी बोलावले का?असे मोराळे यांना स्पोर्ट्स पॅनोरमाने विचारले .तर त्या म्हणाल्या तांदळे हे अधिकारी नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत चौकशी करता त्यांना याठिकाणी बोलावले होते .
सुट्टीच्या दिवशी क्रीडा अधिकारी पी .एस .चव्हाण उपस्थित होते.नावंदेंना विचारणा केली कि ,क्रीडा अधिकारी चव्हाण याठिकाणी उपस्थित कसे ?तर त्या म्हणाल्या पुरेसे मनुष्यबळ आणि अतिरिक्त तीन अधिकार्यांचा कामाचा भार त्यांच्यावर असल्यामुळे मी त्यांना याठिकाणी सुट्टीच्या दिवशी येण्यास परवानगी दिली .कार्यालयीन दस्तावेज घरी घेऊन जाण्यास परवानगी दिली यानंतर क्रीडा अधिकारी कार्यालयाचे काही दस्तावेज ज्याठिकाणी ठेवण्यात आले होते त्या ठिकांणची चावी सुट्टीच्या दिवशी उपलब्ध नसल्यामुळे ते उपसंचालक उर्मिला मोराळे यांच्याद्वारे सील करण्यात आले .कविता नावंदेंचा चौकशीनंतर कागदपत्रे सावरासावर करण्याचा प्रयत्न झाला आहे असे क्रीडा प्रेमिनला वाटत आहे.
खातेनिहाय चौकशी अजुन का नाही पाहा
जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांची करण्यात येणारी चौकशी हि सातारा येथील २०१२ मधील प्रकरणापासून आणि अहमदनगर येथील २०१८-१९ तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी असताना नावंदे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यावेळेस खात्या अंतर्गत चौकशी करण्यात आली होती . यामध्ये औरंगाबाद उपसंचालक उर्मिला मोराळे , माजी अमरावती उपसंचालक प्रतिभा देशमुख ,पुणे उपसंचालक प्रमोधिनी अमृतवाड यांच्यामार्फत २०१९ साली प्राथमिक चौकशी मधे नावंदे यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्यामुळे नावंदेची दुसऱ्यांदा खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देऊन सुधा अजुन कोणत्याही प्रकारची चौकशी करण्या आलेली नाही.
नावंदेची चौकशी पुणे येथील मुख्य कार्यालयामध्ये करण्यात यावी व औरंगाबाद विभाग येथे न करता पुणे येथे करण्यात यावी कारण हे प्रकरण सातारा आणि अहमदनगर या ठिकाणचे असुने पुणे विभाग म्ध्यचे जवळचे आहे अंतर जास्त असल्यामुळे व अधिक वेळ जात असल्यामुळे आपण पुणे विभागातच चौकशी करण्यात यावी असे असा क्रीडा प्रेमीना वाटत आहे.
विभागीय चौकशी व प्राथमिक चौकशी न करण्याकरता थेट क्रीडा मंत्र्यांना विनवणी
एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनानुसार बुधवारी त्यांनी क्रीडामंत्री केदार यांना पत्र पाठवून पुन्हा चौकशी न करण्याची विनंती केली आहे .क्रीडा विभागातील व काही बाह्य व्यक्ती हेतुपुरस्कर मला मानसिक त्रास देवून शासकीय कामकाजाच्या गतीमध्ये बाधा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. विभागीय चौकशी व प्राथमिक चौकशी न करण्याकरताची विनवणी क्रीडा मंत्री सुनील केदार यांना पत्राद्वारे बुधवार दि .४ रोजी करण्यात आली आहे .हे पत्र स्पोर्ट्स पॅनोरमाकडे उपलब्ध आहे .
कविता नावंदे यांच्यावर आधीही आर्थिक गैरव्यवहाराचा आणि शासनाची दिशाभूल करण्याचा ठपका लागला होता. सातारा येथील २०१२ मधील प्रकरणापासून आणि अहमदनगर येथील २०१८-१९ तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी असताना नावंदे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यावेळेस खात्या अंतर्गत चौकशी करण्यात आली होती. नावंदे यांच्याविरुद्ध पत्रकार दिगंबर वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून चौकशी करण्याबाबत विनंती केली होती. या पत्रामध्ये क्रीडा मार्गदर्शक असताना शासनाच्या पूर्व परवानगी शिवाय निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेतल्याबद्दल तसेच सातारा जिल्हा येथील स्वयंसिद्धाचे टेंडर स्वतः टाकून शासनाची दिशाभूल केली.
या विषयी तक्रारकर्ते शाम भोसले सरचिटणीस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी यांना संपर्क साधला असता ते बोलतांना म्हणाले कि ,क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या वतीने निलंबन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.तसेच असे ही म्हणाले होते कि निलंबन नव्हेच तर बडतर्फ करण्यात येईल असे भेटीदरम्यान मागेच सांगितले होते. याविषयीचा अहवाल माहिती अधिकाराच्या माध्यमातून मागवण्यात आला होता तोही देण्यात आला नाही या ठिकाणी काहीतरी डाळ शिजत आहे असा संशय निर्माण झाला आहे. तरी माझा ठाकरे सरकारवर विश्वास असून नक्कीच यावर कारवाई करण्यात येईल अशी आशा बाळगतो तसेच त्यानंतर झालेल्या अफरातफरिची वसुली करण्यात यावी व त्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.नाहीतर मी उपोषण करण्या करता बसेल असे यावेळी बोलतांना म्हणाले .
कोण घालत आहे पाठीशी
१) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर तात्काळ वर्तणूक प्रमाणपत्र द्यावे लागते यांनी आजपर्यंत ? दिले नाही.
२) अनुभव प्रमाणपत्र ही बनावट आहेत ?
३) स्वयंसिद्धी असोसिएशन महाराष्ट्र पुणे या संस्थेच्या नावाने सातारा येथे विविध विकास कामे नावंदे यांनी कसे घेतले.
४) १०२०/प्र.क्र.५३/क्रीयुसे-२ दि. ९ मार्च २०२१ अन्वये विभागीय चौकशी सुरू आहेत परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई किंवा निलंबन ? झाले नाहीत.
५) अहमदनगर येथे कोटी रुपयांचे घोटाळे केल्यानंतर एक FIR दाखल झाल्यानंतर यांची बदली हिंगोली येथे झाली.
६) क्र. आस्थापना/जिक्रीअ/बदली/२०२०/का-१ दि.सप्टेंबर २०२० अन्वये राजकीय वजन वापरून औरंगाबाद .
७) विभागीय क्रीडा संकुल येथील उच्च न्यायालयात एक सुमोटो याचिका दाखल असताना ही यांनी जिल्हा क्रीडा कार्यालयची दुरुस्ती कुणाच्या आदेशांनी केली ?
या प्रश्ना मुळे संशयाची सुई माजी मंत्री विनोद तावडे यांच्याभोवती फिरत आहे. अजून कित्येक दिवस भ्रष्टचारी अधिकारी पाठीशी घालणार आहे.हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहेत नावंदे यांना निलंबित न करता बडतर्फ करून त्यांची चौकशी नि:पक्षपातीपणे करण्यात यावी, असे औरंगाबाद,सातारा आणि अहमदनगर येथील सर्व क्रीडा संघटनामार्फत मागणी करण्यात येत आहे.
तसेच याविषयी विधानपरिषदेमध्ये चार आमदारांनी तारांकित प्रश्न मांडला होता पण तो पटलावर मांडण्यात आलेला नाही. हा प्रश्न कुठे दडपण्यात आला असा प्रश्न क्रीडाप्रेमींमध्ये निर्माण झालेला आहे. अशा प्रत्येक भ्रष्ट अधिकाऱ्यांचे प्रश्न दडपण्यात अथवा पाठीशी घालण्याचा प्रयत्न शासनामार्फत करण्यात येत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासन आणि प्रशासन यांच्यात संगम मत झाले आहे की काय असा संशयाचा सूर क्रीडाप्रेमी मार्फत बोलण्यात येत आहे.