मुंबई : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये राष्ट्रीय विक्रम केल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या स्पर्धेत खेळणाऱ्या अविनाश साबळेने त्रिवेंद्रम येथे झालेल्या इंडियन ग्रांप्री-२मध्ये आणखी एक राष्ट्रीय विक्रम रचला. त्याने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ८.१६.२१ अशी वेळ नोंदवत आपलाच जुना विक्रम १.९१ सेकंदांने मोडित काढला.
Avinash Sable breaks his own National record for the 8th time by clocking 8:16:21 in the men's 3000m steeplechase event at the Indian GP2. His previous NR was 8:18:12 at the Tokyo Olympics #bluerising pic.twitter.com/GWsn2D2GUF
— Indian Sports Honours (@sportshonours) March 24, 2022
अविनाशने टोक्योमध्ये ८.१८.१२ अशी वेळ नोंदवली होती. हरियाणाचा शंकर लाल (८.३६.३७ मिनिटे) त्याच्या मागे होता. महिलांच्या स्पर्धेत यूपीच्या पारुल चौधरीने ९.३८.२९ मिनिटे वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले.
पुरुषांच्या शॉटपुटमध्ये, उत्तराखंडच्या अनिकेतने १७.४२ मीटरसह सुवर्ण आणि उत्तराखंडच्या अधिश घिलडियालने १६.४८ मीटरसह रौप्यपदक जिंकले. महिलांच्या या स्पर्धेत उत्तराखंडच्या रमनीत कौरने १३.८६ मीटरसह सुवर्णपदक जिंकले. हिमाचल प्रदेशच्या अंकेश चौधरीने ८०० मीटरमध्ये १.४८.२७ मिनिटे वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले.