मुंबई : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ११५ धावांनी जिंकून कांगारूंनी इतिहास रचला आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर पाकिस्तानी फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर पूर्णपणे हार पत्करली आणि सामन्याच्या पाचव्या दिवशी त्यांच्या १० विकेट्स गमावल्या. या सामन्यादरम्यान एक मजेशीर घटना घडली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर हसन अलीची खिल्ली उडवताना दिसला.
हसन अली ८८व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर नाथन लायनच्या गोलंदाजीवर बाद झाला. यादरम्यान एक मजेदार घटना घडली. सिली पॉइंटवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या वॉर्नरने हसन अलीसमोर सेलिब्रेशन केले. हसन अली ज्याप्रकारे सेलिब्रेशन करतो, तसेच सेलिब्रेशन वॉर्नरने केले.
पाकिस्तानच्या संघाने त्यांच्याच घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाकडून तीन सामन्यांची कसोटी मालिका १-०ने गमावली. या मालिकेत उस्मान ख्वाजाने ऑस्ट्रेलियासाठी शानदार फलंदाजी केली, तर फिरकी गोलंदाज नाथन लायननेही आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात लायनने ५ विकेट्स घेतल्या.
https://twitter.com/taimoorze/status/1507312785004408835?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1507312785004408835%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtradesha.com%2Fpak-vs-aus-david-warner-mocks-hassan-ali-with-his-own-celebration-watch-video%2F
महत्त्वाच्या बातम्या –
मंत्री महोदय सुनील केदार साहेब औरंगाबादच्या क्रीडाधिकारी कविता नावंदेवर कारवाई कधी?
महाराष्ट्राच्या अविनाश साबळेचा भीमपराक्रम; मोडला स्वत:चाच ऑलिम्पिक रेकॉर्ड!