पुणे(प्रतिनिधी): पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड(पीएसपीबी) आयोजित 42व्या पीएसपीबी आंतर युनिट गोल्फ स्पर्धेत ओआयएलच्या दोन्ही संघांनी सांघिक विभागात पाहिले दोन क्रमांक राखताना दुसऱ्या दिवसावर वर्चस्व गाजवले. आजच सुरू झालेल्या वैयक्तिक स्पर्धांवर हरिमोहन सिंग याने 69 गुणांसह अव्वल स्थान पटकावून वर्चस्व गाजवले.
वैयक्तिक स्पर्धेत हरिमोहन सिंगचा सहकारी ओआयएल संघाच्या मिलिंद सोनीने 70 गुणांची नोंद करताना दुसरे स्थान राखले. आता उद्या सर्व खेळाडू 18 होल्सच्या दुसऱ्या फेरीत सहभागी होतील आणि दोन फेऱ्यांच्या एकूण कामगिरीवरून अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारे खेळाडू निश्चित होतील.
त्याबरोबरच आजच्या सांघिक स्पर्धांमध्ये ओआयएलच्या अ संघाने 214 गुणांची नोंद करताना पहिला क्रमांक पटकावून ओआयएलच्याच ब संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानण्यास भाग पाडले. आयओसीएलच्या अ संघाने 234 गुणांसह तिसरा क्रमांक राखला.
याशिवाय मेट सांघिक स्पर्धेत बीपीसीएलच्या ब संघाने 220 गुणांसह पहिला क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ आसाम ऑइल डिव्हिजन आणि एचपीसीएल अ संघ यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले.
निकाल: स्ट्रोक प्ले:
वैयक्तिक स्पर्धा: पहिली फेरी: 1.हरिमोहन सिंग(ओआयएल)69(ग्रॉस)गुण; 2.मिलिंद सोनी(ओआयएल)70गुण;
बेस्ट ग्रॉस सांघिक स्पर्धा: 1.ओआयएल अ 214 गुण, 2.ओआयएल ब 233 गुण, 3.आयओसीएल अ 234 गुण;
नेट सांघिक स्पर्धा: 1.बीपीसीएल ब 220 गुण, 2.आसाम ऑईल डिव्हिजन ब 226गुण, 3.एचपीसीएल अ 226गुण.