छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) बोगस कागदपत्रांद्वारे इंटरनेट बँकिंगचे अधिकार मिळवत विभाग क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यात स्वतःच्या मोबाईलवर नेट बँकिंग सुरू करून अवघ्या सहा महिन्यात तब्बल 21,59,38,287 रुपयांचा महाघोटाळा करून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे विभागीय उपसंचालक कार्यालय क्रीडा व युवक सेवा संचालक छत्रपती संभाजीनगर विभागाचे तब्बल सहा महिन्यांनी आपल्या बँक खात्याकडे लक्ष न गेल्याने सरकारी कर्मचार्यांच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे हा महाघोटाळा कंत्राटी संघणक ऑपरेटर लिपिकांनी केलेले असल्याचे सध्या निदर्शनास आले आहे या घोटाळ्याची मुळे किती खोलवर रुतली आहेत याचा शोध आर्थिक गुणांशाखा घेत आहे.
या प्रकरणाची तेजस दीपक कुलकर्णी (वय 37 वर्ष क्रीडा क्रीडा विभाग उपसंचालक कार्यालय क्रीडा व युवक सेवा संचनालय छत्रपती संभाजी नगर विभाग जिल्हा छत्रपती संभाजीनगर राहणार प्लॉट नंबर 5 दुर्बीकुर आपारमेंट नंदीग्राम कॉलनी एस आर पेट्रोल पंप जवळ छत्रपती संभाजी नगर) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार यांच्यातील आरोपी क्रमांक एक व दोन (एक नंबर अक्षय कुमार अनिल शिरसागर राहणार बीड बायपास छत्रपती संभाजी नगर कंत्राटी संघनक ऑपरेटर/लिपिक २ यशोदा शेट्टी लिपिक) यांनी स्वतःच्या आणि विभागीय क्रीडा संकुल समितीचे बँक खात्यास नेट बुकिंग सुविधा चालू करून घेण्यासाठी उपसंचालक यांचे नाव व स्वाक्षरीचा वनवट वापर केला व कार्यालयीन कामकाजातील जुने पत्रांची छेडछाड करून बँकेचे खोटे व बनावट मजकूर पत्र तयार केले.
आरोपी क्रमांक एक हर्षकुमार अनिल शिरसागर याने स्वतःच्या मोबाईल क्रमांकावर नेट बँकिंग सुविधा चालू करण्यासाठी बनावट ई-मेल आयडी([email protected]) तयार करून सदर ई मेल आयडीवर विभागीय क्रीडा संकुल समितीच्या नावे असलेल्या खाते व नेत बँकिंग सुविधा चालू करण्यासाठी पत्र पाठवून नेट बँकिंग सुविधा चालू करून घेऊन स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी स्वतःचे खात्यावर वळवून त्यानंतर सदर रक्कम इतर खात्यावर वळती केली . एकूण 21, 59,38,287 (एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडतीस हजार दोनशे सत्यांशी रुपये) रक्कमेचा गैरव्यवहार करून अपहार करून फिर्यादी व शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी जवाहर नगर पोलिस स्टेशनमध्ये 1.हर्षकुमार अनिल शिरसागर राहणार बीड बायपास छत्रपती संभाजी नगर संगणक ऑपरेटर लिपिक 2. यशोदा शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.
फरार आरोपी हर्षकुमार शिरसागरची गुन्ह्याची पार्श्वभूमी
फरार आरोपी हर्षकुमार शिरसागर १३ हजार रुपयांच्या वेतनावर रुजू झाला होता. त्याने काही दिवसांपूर्वी दोन आलिशान गाड्या खरेदी केल्या होत्या. त्याच बरोबर सहा महिन्या पूर्वी दोन फ्लॅट खरेदी केलेले असून एक फ्लॅट वडिलांच्या नावे , दुसरा प्रियसीच्या नावावर आहे. तसेच हा आरोपी चीन मध्ये फरार झाला आहे का? तो यापूर्वी अनेक देशांमध्ये तो फिरून आलेला आहे. काही दिवसा पूर्वी त्याला नेण्यासाठी दुसऱ्या आलिशान गाडीमधून प्रियसी स्कुंलामध्ये आली होती. असे क्रीडा प्रेमी द्वारे निदर्शनास आले आहे . आरोपी हा सायबर सिक्युरिटीचा (हॅकिंग) कोर्स करून मुबई या ठिकाणी जॉब करत आहे असे संकुलात सर्वत्र सांगत होता.
आरोपी यशोदा शेट्टी व पती बी.के. जीवन यांची गुन्ह्याची पार्श्वभूमी
यशोदा शेट्टी यांच्या बँक खात्यावर २.५० लाख रुपये व तिचा पती बी.के. जीवन यांचे युनियन बँकच्या खात्यामध्ये १,६९,५०,००० रुपये वळते केल्याचे तपासा मध्ये दिसून आले तसेच इतरही खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम वळविण्यात आल्याचे निर्दशनास आले आहे. या दोघांना आटक करण्यात आली आहे.
क्रीडा उपसंचालक संजय सबनीस
याविषयी क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांना ‘एवढा मोठा घोटाळा लक्षात कसा आला नाही “? असा प्रश्न विचारला असता यावर ते प्रतिक्रिया देत म्हणाले कि सहा महिन्यात हा घोटाळा केला आहे. प्रशासनाने चौकशी केल्यावरच हा प्रकार उघडकीस आला आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्याच्या हातात बँकेचे तपशील कसे ? असा दुसरा प्रश्न विचारला असता ते मोबाईलवर बोलताना म्हणाले क्षीरसागरकडे कार्यालयातील टायपिंग, विद्यार्थ्याची फी भरून घेणे आदी कामे आहेत. त्याने बनवत पत्र , खोट्या स्वाक्षऱ्या करून बँकेकडून इंटरनेट बँकिंगचे अक्सेस घेतले होते . त्याचा गैरवापर करण्यात आला . बँक कर्मचाऱ्यांनी कोणतीही वयक्तिक शाहनिशा न करता इंटरनेट बँकिंगला परवानगी दिली.
प्रकरण उघडकीस कसे आले ?
याचिका फेटाळल्यामुळे प्रकरण आले उघडकीस : सिंथेटिक ट्रॅक आणि अस्त्रोतार्फ साठी निविदा आल्या होत्या . त्यातील एकाने या निविदेवर आक्षेप घेऊन त्याबाबत याचिका दाखल केली होती . ३० सप्टेंबर रोजी न्यायालयाने आक्षेपकर्त्यांची याचिका फेटाळली. निविदेची पुढील प्रक्रिया करण्याच्या वेळी विधानसभा निवडणुका लागल्याने आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवत असताना हा घोटाळा निदर्शनास आला.
ही रक्कम कोणती होती?
क्रीडा विभागाने २०१९ मध्येच विभागीय क्रीडा संकुलामध्ये सिंथेटिक ट्रॅक आणि अस्त्रोतार्फ साठी सरकारने निधी मंजूर केला होता .शासनाकडून विभागीय क्रीडा संकुलाच्या खात्यावर जवळपास २२ कोटी रुपये जमा करण्यात आले . मात्र , वेळोवेळी निविदा मागवूनही कंपनी मिळाली नाही . यामुळे गेल्या चार वर्षापासून ही दोन्ही कामे रखडली. यातून हा पैसाही तसाच संकुलाच्या खात्यावर पडून राहिला. यावरच हर्ष क्षीरसागरने डल्ला मारला.
सिंथेटिक ट्रॅकचे आता काय होणार ?
आता या सिंथेटिक ट्रॅकचा पैसा कधी भेटणार व आलेला तोंडाचा घास पळून नेल्याप्रमाणे ही घटना घडली आहे छत्रपती संभाजी नगर मधून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडणाऱ्या खेळाडूंची प्रतीक्षा पुन्हा लांबणीवर जाण्याची दाट शक्यता आहे तरी यामध्ये नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच या खात्याचे क्रीडामंत्री दत्ता भरणे खेळाडूनकरिता काय पाऊल उचलतात याकडे सर्व क्रीडा प्रेमींचे लक्ष लागले आहे.
ही सर्वात मोठी क्रीडाप्रेमी करता आश्चर्याची घटना घडली आहे सर्व कारभार अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर सोडून देणे हे कितपत योग्य आहे असा प्रश्न क्रीडाप्रेमींच्या माध्यमातून विचारण्यात येत आहे. असला प्रकार पुन्हा घडणे नाही या करिता सरकारने सर्वत्र सुरु असलेल्या खाजकीकरण करणे थांबवले पाहिजे आणि क्रीडा खात्यात शासकीय पदाची भरती करण्याची आवश्यकता आहे .