छत्रपती सभाजीनगर (प्रतिनिधी): बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा येथील वकील आणि न्यायिक अधिकाऱ्यांचे १०२ संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे विभा पी. इंगळे (प्रिंसिपल डिस्ट्रिक्ट & सेशंस जज औरंगाबाद/छत्रपती संभाजीनगर) या प्रसंगी पाहुणे डी.एच.केळुसकर (अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश) यांच्या उपस्थिती होती.
ॲड. जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद पाटील व सचिव तीर्थराज चावरे, उपाध्यक्ष सुनील पडुल यांच्यासह जिल्हा बार असोसिएशनचे समिती सदस्य व आयोजन संचालक अधिवक्ता संजय डोंगरे यांच्या अध्यक्षतेखालील स्पर्धा आयोजन समितीचे सदस्य सहभागी झाले होते.
जिल्हा बार असोसिएशन छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी लीगा सामन्यांच्या समारोपाच्या वेळी, स्थानिक बार डीबीए – छत्रपती संभाजीनगरच्या सर्व 3 संघांनी या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत.

ॲड.आशुतोष मिश्रा 41 चेंडूत 75 धावा आठ चौकार चार षटकार (४-८, ६-४) आणि 2 बळी,ॲड.पवन इप्पर 54 धावा करत गोलंदाजीमध्ये चार गडी बाद केले, मुकुल जाजूने 35 चेंडूत 57 धावा केल्या, सर्व 4 स्थानिक संघांने एकूण १३ सामन्या मध्ये चार झालेले सामन्या सर्व विजय प्राप्त केला ही प्रमुख कामगिरी होती.