छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी): हर्षकुमार अनिल क्षीरसागरने हा घोटाळा करण्यासाठी उपसंचालकांच्या नाव आणि स्वाक्षरीचा वापर करून बँकेस बनावट मजकुराचे पत्र पाठवून खात्याला स्वतःचा मोबाइल क्रमांक जोडला. मोबाईल नंबर जोडल्यानंतर नेट बँकिंग सुविधा सुरू करून घेत पैसे ट्रान्स्फर केले. आतापर्यंत क्षीरसागर, शेट्टी यांच्या खात्यात 59 कोटी आले. हा प्रकार उघड झाला आहे. हर्षकुमार अनिल क्षीरसागर असं मुख्य आरोपीचे नाव असून, तो एसयुव्ही कार घेऊन फरार झाला आहे. क्रीडा संकुलासाठी शासनाकडून प्राप्त होणारा निधी जमा होण्यासाठी क्रीडा संकुलाच्या नावाने इंडियन बँकेमध्ये खाते उघडण्यात आलं होतं.
मंत्रालयात दिनांक २५ डिसेंबर रोजी इंडियन बँक च्या कर्मचारी आणि मुख्य मॅनेजर यांना बोलवण्यात आले होते? का बोलावण्यात आले याची गुप्तता प्रशासन मार्फत ठेवण्यात आलेली आहे. याविषयी राज्याच्या क्रीडामंत्री दत्तामामा भरणे यांना फोन द्वारे संपर्क केला असता कोणताही प्रतिसाद दिला नाही.
मंत्रालयात का बोलवण्यात आले असेल
बुकमध्ये नोंदी, पावती बुक लिहिणे, बँकेची पत्रव्यवहार करणे असे काम क्षीरसागर आणि यशोदा शेट्टी करत होते. 2023 पासून त्यांच्या खात्यात जवळपास 59 कोटी सात लाख 82 हजार रुपयांचा निधी आला होता. त्यामधून कोट्यावधी रुपये त्यांनी वळते केले. अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली.
या हर्षकुमार अनिल क्षीरसागर आरोपी सोबत असणारा त्याचा मित्र हाही संपर्कात नाही नितीन राजपूत याच्या नावावर स्कोडा कुशक असून ही गाडी आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याने खरेदी करून दिली आहे व नितीन राजपूत ला शेअर्स मार्केट शी संबंधित माहिती असल्यामुळे हर्षकुमार शिरसागर ने त्याच्या मदतीने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केली आहे आणि असे खात्रीलायक सूत्रांच्या द्वारे ही माहिती प्राप्त झाली आहे. त्या माहितीच्या आधारे नितीन राजपूत यांना संपर्क साधला असता सर्वत्र नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे यावरून असा संशय सुई निर्माण होत आहे की नितीन राजपूत हा हर्ष कुमार शिरसागर यांच्यासोबत आहे .
हर्ष कुमार आणि नितीन राजपूत यांची मैत्री कधी झाली
नितीन राजपूत हा विभागीय क्रीडा संकुल येथे पोलीस भरतीची तयारी करण्याकरिता येत होता या ठिकाणी त्यांची जवळीक झाली आणि आज पर्यंत दोघे सोबत असल्याची चर्चा आहे.
वेव्व एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी हा महाघोटाळा करून सुद्धाही वेव्व एजन्सीवर कोणत्या प्रकारे कारवाई करण्यात आली नाही तसेच वेव्व एजन्सीच्या डोंगरे आणि आरोपी हर्षकुमार यांनी बहुतेक कामे या ठिकाणी घेतले आहे आणि केली आहे त्यामुळे एजन्सी चे डोंगरे यांना स्पोर्ट्स पॅनोरमाच्या मध्यमा कडून फोन करून संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली. यामुळे वेव्व एजन्सीची सर्व चौकशी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या माध्यमातून बहुतेक कामांमध्ये केलेल्या घोटाळे ही समोर येण्याची दाट शक्यता आहे.
कोणती काम केली ? आणि कोणाचा होता विश्वास ?
लेबर कॉन्ट्रॅक्ट, सिक्युरिटी गार्ड एजन्सी व्यतिरिक्त एलईडी लाईट , सीसीटीव्ही कॅमेरा, त्याचबरोबर बायोमेट्रिक , अनेक कामांची ऑर्डर मिळालेली आहे . जिल्हाधिकारी कार्यालयात माजी लेखा अधिकारी आरोपी हर्षकुमार क्षीरसागर यांच्याकडून आलेली फाईल न बघता मंजूर करत असे त्याचबरोबर माजी मंत्रीचे पीए, त्याचबरोबर बहुतेक मोठे अधिकारी यांचा त्याच्यावर मोठा विश्वास होता. यामुळे संशयाची सुई या सर्वांकडे ही फिरत आहे आणि यांची पण या मध्ये चौकशी करणे गरजेचे असे क्रीडा प्रेंमीच्या वातीण्या दबक्या आवाजात म्हण्यात यात आहे . लवकरच या सर्वाचे नावे स्पोर्ट्स पॅनोरमाच्या माध्यमातून समोर अन्याचा प्रयतन करणार आहे.
पोलिसाची कारवाही काय करण्यात आली
यशोदा शेट्टी व पती बी.के. जीवन यांना अटक करून आजपर्यंत तीन फ्लॅट , यामध्ये लक्झरी फॅट आणि बायपास येथे घेण्यात आलेले दोन फ्लॅट बीएमडब्ल्यू कार, बीएमडब्ल्यू दुचाकी, सोने खरेदी करण्यासाठी सराफा वाल्याला दिलेले पैसे, कोटींची बँकेमध्ये करण्यात आलेली एफडी पोलिसांमार्फत पंचनामे करून सीज करण्यात आली आहे. यामध्ये पोलीसांचा वेगाने तपास सुरु आहे.