छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): क्रीडा विभागातील २१.५९ कोटींचा घोटाळा करणारा मुख्य आरोपी हर्षकुमार अनिल क्षीरसागर (वय २१, रा. सातारा परिसर) याला अखेर दिल्लीतून बेड्या ठोकल्या. गुन्हा दाखल झाल्यावर ११ दिवसांपासून तो फरार होता. दरम्यान, त्याला न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
विभागीय क्रीडा संकुल समितीचे बँक खाते इंटरनेट बँकेशी जोडून अवघ्या सहा महिन्यांत आरोपी हर्षकुमारने सरकारी खात्यातील रक्कम स्वत:च्या बँक खात्यात घेऊन हा घोटाळा केला होता. त्यावरून २२ डिसेंबरला हर्षकुमार, यशोदा जयराम शेट्टी (३८) आणि यशोदाचा पती बी. के. जीवन या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यशोदा आणि जीवन हे पहिल्या दिवशीच अटक केले होते. हर्षकुमार जीवनच्या नावावर असलेली एसयूव्ही कार घेऊन पसार झाला होता. वेगवेगळी ७ पथके स्थापन करून पोलीस या गुन्ह्याचा तपास करीत होते. सायबर पोलिसांकडून मिळालेल्या तांत्रिक माहितीवरून गुन्हे शाखेने दिल्लीतून हर्षकुमारला अटक केली. त्याला विमानाने बुधवारी (दि. १) शहरात आणले. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हर्षकुमार हा वेव मल्टिसर्व्हिसेस या कंपनीतर्फे कंत्राटी पद्धतीने संगणक ऑपरेटर म्हणून रुजू झाला होता. त्याला अवघा १३ हजार पगार दिला जायचा. या घोटाळ्यातील रक्कम मिळाल्यावर तो अवघ्या ८ वेळा परदेशात जाऊन आल्याचे तपासात समोर आले आहे. तपास अधिकाऱ्यांनी ही माहिती न्यायालयात दिली आहे.
त्याच्या आई-वडिलांना कर्नाटकमधून अटक केली आहे.

आई- वडिलांना कसे केले अटक
छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुलामध्ये 21 कोटींवर डल्ला मारून हर्ष क्षीरसागर हा आलिशान एसयुव्ही घेऊन फरार झाला होता. अखेरीस आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून हर्षला बेड्या ठोकल्या आहे. पण त्याचे आई- वडिल हे सुद्धा हर्षच्या कारनाम्यानंतर फरार झाले होते. त्याचे आई-वडिल हे कर्नाटकला पळून गेले होते. आर्थिक गुन्हे शाखेच्या टीमने कर्नाटकमध्ये जाऊन मुरडेश्वर येथून दोघांना ताब्यात घेतलं. हर्षने केलेल्या घोटाळ्यातून अनिल क्षीरसागर वडिलांच्या नावावर ४ फ्लॅट विकत घेतले होते. तर मनीषा अनिल क्षीरसागर आईच्या नावावर इतर प्रॉपर्टी विकत घेतली होती. त्यामुळे या गुन्हात दोघांना अटक केली आहे.
कोट्यवधींचा घोटाळा करून पसार झालेल्या हर्षकुमार क्षीरसागर याची मैत्रीण अर्पिता वाडकर हिला पोलिसांनी शनिवारी नवी मुंबईच्या कोपरखैरणे भागातून अटक केली. हर्षकुमारच्या आणखी संपत्ती आणि घोटाळ्याच्या रकमेबाबत तिच्याकडून मोठा उलगडा होण्याची शक्यता आहे. अवघ्या 11 महिन्यांत 21.59 कोटींचा घोटाळा करणाऱ्या हर्षकुमारने अर्पितालादेखील या घोटाळ्याचा भागीदार केले होते.
अर्पिताला कसे केले अटक
बी. ए.च्या तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या अर्पिताला चार बहिणी असून, अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातील आहे. वडील अर्धांगवायूने त्रस्त असून, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आई शाळेत कर्मचारी म्हणून काम करते.
हर्षकुमारचे कारनामे उघड होताच अर्पिता घरी गेली. वरिष्ठांच्या आदेशावरून गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांचे पथक शुक्रवारी रात्रीच मुंबईच्या दिशेने रवाना झाले. २९ डिसेंबरला 9 वाजता अर्पिताला घरातून अटक केली. तेव्हा कुटुंब हादरून गेले.
तिच्या घराच्या तपासणीत मौल्यवान वस्तू आढळून आली नाही. हर्षकुमारने दिलेले दोन महागडे मोबाइल ती वापरत होती.

हर्षकुमारची मैत्रीण अर्पिताला हर्षकुमारने दीड कोटीचा फ्लॅट गिफ्ट केला होता आता तिला देखील पोलिसांनी अटक केलीये. उपसंचालक कार्यालय देखील पोलिसांकडून सील करण्यात आले.
मुख्य आरोपी हर्षकुमार यांच्या लेटर बॉम्बने आता अनेकांची नावे समोर आली होती. ही सगळी सिस्टम मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर अशी सुरू होती. विभागीय क्रीडा संकुल आणि बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव आल्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आता या प्रकरणामध्ये स्वतः हर्षकुमार पोलिसांकडे काय खुलासे करतो पाहणे खूप रंजक ठरणार आहे . त्याचबरोबर बीड बायपास रोड येथील नामांकित लॉन्स समोरील नामांकित हॉटेल मध्ये काय घडत होते हे पोलिसांच्या खाक्या मधून समोर येणार का? हे पाहणे क्रीडा प्रेमींसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.
कोण आहे नागेश डोंगरे ?
नागेश डोंगरेलाही अटक , याप्रकरणात सहा आरोपी सह एक मुख्य आरोपीलाही अटक केली आहे . त्याच बरोबर वेव एजन्सीचे व्यवस्थापक नागेश डोंगरे अटकेत आहेत . डोंगरे आणि मुख्य आरोपी हर्षकुमार यांनी मिळून 80 लाखाचे कंत्राट घेतले होते. जमीन घेण्यासाठी हर्ष कडून डोंगरेंनी 50 लाखाची वडिलांची एफडी मोडून , तर 30 माझ्याकडे असल्याचे संगितले. त्याचा भाऊ नेवी मध्ये असून घरचा श्रीमंत असल्याचे तो डोंगरे यांना सांगायचा त्यामुळे पैसे घेतले आहे असे डोंगरे तांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले . संकुलतील प्रत्येक व्यक्तिला माहीत होते की या दोघांचे काम सोबत चालत असे त्याचबरोबर 3 वर्षापूर्वी डोंगरे यांनी माझी जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून 9 लाखांचे मोफत भेटणारे सॉफ्टवेअर मंजूर करून आणले होते तत्कालीन उपसंचालक यांना यामध्ये चुकीचे निदर्शनास आल्यामुळे कामास परवानगी दिली नाही व कोणत्याही प्रकारचे काम करण्यास सांगितले नाही .

नितीन राजपूत याच्या नावावर स्कोडा कुशक असून ही गाडी आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याने खरेदी करून दिली आहे व नितीन राजपूत ला शेअर्स मार्केट शी संबंधित माहिती असल्यामुळे हर्षकुमार शिरसागर ने त्याच्या मदतीने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केली आहे आणि असे खात्रीलायक सूत्रांच्या द्वारे ही माहिती प्राप्त झाली आहे. त्या माहितीच्या आधारे नितीन राजपूत यांना संपर्क साधला असता सर्वत्र नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे यावरून असा संशय सुई निर्माण होत आहे की नितीन राजपूत हा हर्ष कुमार शिरसागर यांच्यासोबत नेहमी असायचा

असला प्रकार दोन वर्षापूर्वीही घडला होता !
खात्री लायक सूत्राच्या माध्यमातून सध्याचे क्रीडा मंत्री इंदापूरचे आमदार दत्ता मामा भरणे यांच्या जिल्ह्यामध्ये दोन वर्षापूर्वी एका कंत्राटी कर्मचार्याच्या अकाऊंट वरुण एटीएम च्या माध्यमातून तालुका क्रीडा अधिकार्याने तालुका क्रीडा संकुलाचा लाखाचा निधी कंत्राटी कर्मचार्याच्या भोळसर स्वभावाचा फायदा घेऊन खोटे अकाऊंट उघडून त्यावर पैसे पाठवण्यात आले आणि तालुका क्रीडा अधिकार्याने एटीएम द्वारे काढण्यात आले होते. त्या तालुका क्रीडा अधिकार्याची जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून पद उन्नती ही करण्यात आली आहे. पद उन्नतीवेळी त्या पैसे पुन्हा तालुका क्रीडा संकुलाच्या अकाऊंट वर टाकण्यात आला हा प्रकार घडल्यावर त्यावर कठोर अशी कारवाही न करण्यात आल्यामुळे त्याची पुनरावृत्ती झाली आहे का ? तसेच मंत्री मोहद्य या कडे कोणत्या पद्धतीने पाहून कारवाही करता हे पाहणे क्रीडा प्रेमींसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.